वॉशिंग्टन, दि. 16 - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे अध्यक्षीय कारकीर्द संपुष्टात आल्यानंतरही विविध कारणांनी चर्चेत असतात. सध्या ओबामांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. ओबामा यांनी न्यूयॉर्कमधील शॉर्ट्सविल येथे झालेल्या हिंसेविरोधात दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी चळवळीचे नेते नेल्यस मंडेला यांची आठवण काढत एक ट्विट केले होते. हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट बनले आहे. आत्तापर्यंत सुमारे 28 लाख लोकांनी हे ट्विट लाइक केले आहे. तसेच 12 लाखाहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. न्यूयॉर्कमधील शॉर्ट्सविल येथे काही हिंसक घटना घडल्या होत्या. त्याविरोधात ओबामा यांनी हे ट्विट केले आहे. कोणतीही व्यक्ती वर्ण, मातृभूमी आणि धर्म यांच्यामुळे दुसऱ्याबाबत भेदभाव मनात ठेऊन जन्म घेत नाही, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये ओबामांचे एक छायाचित्रसुद्धा प्रकाशित करण्यात आले आहे. ज्यामध्ये ते एका खिडकीमध्ये उभ्या असलेल्या वेगवेगळ्या जातीच्या आणि वंशाच्या मुलांकडे पाहत आहेत. दरम्यान, ट्विटरने ओबामांनी केलेले हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट बनल्याचे सांगितले. जगभरातील 28 लोकांनी हे ट्विट लाइक केले आहे. तसेच सुमारे 12 लाख लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. सर्वाधिक रिट्विट करण्यात आलेल्या ट्विटच्या यादीत हे ट्विट पाचव्या क्रमांकावर असल्याचेही ट्विटरच्यावतीने सांगण्यात आले. सर्वाधिक लोकप्रिय ट्विटचा विक्रम याआधी पॉप स्टार एरिना ग्रानाडे हिच्या ट्विटच्या नावे होता. तिचे ट्विट सुमारे 27 लाख लोकांनी लाइक केले होते.
बराक ओबामा दिसणार शिमोन पेरेज यांच्या डॉक्युमेंट्रीमध्येलॉस एंजिलिस, दि. 4 - इस्त्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात येणा-या डॉक्युमेंट्रीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री व गायिक बार्बरा स्ट्रायसँड दिसणार आहेत. हॉलिवूड रिपोर्टरनं दिलेल्या वृत्तानुसार, नेव्हर स्टॉप ड्रीमिंग : द लाईफ अँड लेगसी ऑफ शिमोन पेरेस ( 'Never Stop Dreaming: The Life and Legacy of Shimon Peres' ) ,असे डॉक्युमेंट्रीचे नाव आहे. ऑस्कर विजेता रिर्चड ट्रंक या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शक आहेत. तर निर्मिती मोरिआ फिल्म्स करत आहे. 2016 मध्ये या डॉक्युमेंट्रीवर काम करण्यास सुरुवात झाली आणि एक्सक्लुझिव्ह अशी 60 तासांची मुलाखत रेकॉर्ड करायची होती. मात्र सप्टेंबर 2016 मध्ये पेरेज यांचे अनपेक्षितपणे निधन झाले. शिमोन पेरेज यांच्यावरील डॉक्युमेंट्री सध्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती ट्रंक यांनी दिली आहे.