मुहम्मद अलीची रद्द झालेली शिक्षा पुन्हा माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:51 AM2018-06-10T03:51:10+5:302018-06-10T03:51:10+5:30
व्हिएतनाम युद्धाच्या वेळी सक्तीच्या लष्करी सेवेस नकार देणारा जगप्रसिद्ध मुष्ठियोद्धा मुहम्मद अली याला झालेली कारावासाची शिक्षा ३६ वर्षांपूर्वीच रद्द झाली असूनही विशेषाधिकार वापरून ती रद्द करण्याचा आपण विचार करत आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने अली यांचे कुटुंबीय बुचकळ्यात पडले आहेत.
वॉशिंग्टन : व्हिएतनाम युद्धाच्या वेळी सक्तीच्या लष्करी सेवेस नकार देणारा जगप्रसिद्ध मुष्ठियोद्धा मुहम्मद अली याला झालेली कारावासाची शिक्षा ३६ वर्षांपूर्वीच रद्द झाली असूनही विशेषाधिकार वापरून ती रद्द करण्याचा आपण विचार करत आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने अली यांचे कुटुंबीय बुचकळ्यात पडले आहेत.
कॅनडातील क्वेबेक येथे जी-७ शिखर परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, मुहम्मद अली व इतर काही जणांची शिक्षा माफ करण्याचा मी गांभीर्याने विचार करत आहे. ज्यांना अतिशय अन्याय्य वागणूक दिली गेली, अशा सुमारे ३ हजार जणांना माफी देण्याचा मी विचार करीत आहे.
टष्ट्वील म्हणाले, खरेतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने १९७१मध्ये एकमताने दिलेल्या निकालाने मुहम्मद अली यांची शिक्षा रद्द केली आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांनी माफ करावी अशी कोणतीही शिक्षाच अस्तित्वात नाही. शिक्षा रद्द करण्याची गरजच नाही.
व्हिएतनाममधील युद्ध जोरात असताना अमेरिकी नागरिकांना लष्करी सेवेची सक्ती करणारा कायदा केला गेला. मुहम्मद अली यांनी अशी सक्तीची लष्करी सेवा देण्यास नकार दिल्याने एका जिल्हा न्यायालयाने १९६७मध्ये अली यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा व एक हजार डॉलरचा दंड ठोठावला.
याखेरीज मुहम्मद अली यांचे जागतिक हेवीवेट अजिंक्यपद व पासपोर्ट रद्द करून त्यांना कोणत्याही व्यावसायिक मुष्ठियुद्ध स्पर्धेत भाग घेण्यासही बंदी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने २८ जून १९७१ रोजी अली यांची शिक्षा रद्द केली. त्याआधी त्यांनी मुष्ठियुद्ध स्पर्धेत भाग घेण्यावरील बंदीही उठविली गेली. पार्किन्सन्सच्या प्रदीर्घ आजाराने सन २०१६मध्ये मुहम्मद अली यांचे निधन झाले.
वर्षभरापूर्वी सत्तेवर आल्यापासून ट्रम्प यांनी पाच गुन्हेगारांना माफी देऊन त्यांच्या शिक्षा रद्द केल्या आहेत
तर एकाची फाशीची शिक्षा कमी करून आजन्म कारावास केली
आहे. (वृत्तसंस्था)
स्वत:हून घेतला निर्णय
अली यांच्या कुटुंबीयांचे वकील रॉन टष्ट्वील म्हणाले की, माफी संदर्भात ट्रम्प प्रशासनातील कोणीही आमच्याशी कधीही संपर्क साधलेला नाही. बहुधा ट्रम्प यांनी स्वत:च उत्स्फूर्तपणे हा विषय हाती घेतला असावा.