मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद लढवणार निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 11:06 AM2017-12-03T11:06:01+5:302017-12-03T11:07:47+5:30

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला हाफिझ सईद पाकिस्तानमधील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहे. हाफीझ सईद हा पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमधून उमेदवार म्हणून जनतेसमोर येण्याची शक्यता आहे.

Mumbai attacks chief Hafiz Saeed will fight for the election | मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद लढवणार निवडणूक 

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद लढवणार निवडणूक 

Next

इस्लामाबाद - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला हाफिझ सईद पाकिस्तानमधील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहे. हाफीझ सईद हा पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमधून उमेदवार म्हणून जनतेसमोर येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. मात्र तो पाकिस्तानच्या कुठल्या प्रांतामधून निवडणूक लढवणार याबाबत मात्र माहिती समोर आलेली नाही.  
 भारतासह अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने हाफिज सईद याला दोन दिवसांपूर्वी पुन्हा अटक करण्यात आली होती.  हाफिज याला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे ते समजू शकले नाही.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमाद-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या सुटकेनंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर, हाफिजच्या सुटकेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही अतिशय वाईट संदेश गेल्याचे अमेरिकेने म्हटले होते. दहशतवादाशी लढण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पाकिस्तानातील न्यायालयाने गेल्या आठवड्यात हाफिज याला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश दिले होते.
पाक न्यायालयाने गेल्या आठवड्यात हाफिजला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या कन्या व सल्लागार इव्हांका ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेचे परिणाम लवकरच दिसतील आणि अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव वाढेल, असे सरकारच्या वतीने बुधवारीच सांगण्यात आले होते. 

Web Title: Mumbai attacks chief Hafiz Saeed will fight for the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.