म्यानमारमध्ये सैनिकांना अडवण्यासाठी स्कर्ट्सचा वापर करत आहेत महिला, पण स्कर्ट्स का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 03:32 PM2021-03-15T15:32:18+5:302021-03-15T15:40:41+5:30
म्यानमारमध्ये विरोधाच्या एका खास पद्धतीची चर्चा होत आहे. मिलिट्रीला रोखण्यासाठी महिलांनी त्यांचे स्कर्ट्स उंच घरांवर लटकवले आहेत.
म्यानमारमध्ये फेब्रुवारी २०२१ ला सेनेकडून सत्तापालट करण्यात आल्यानंतर सतत विरोध प्रदर्शन केलं जात आहे. सेनेविरोधातील या प्रदर्शनांमध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. अशात विरोधाच्या एका खास पद्धतीची चर्चा होत आहे. मिलिट्रीला रोखण्यासाठी महिलांनी त्यांचे स्कर्ट्स उंच घरांवर लटकवले आहेत.
रॉयटर्सनुसार, म्यानमारच्या महिला एक खासप्रकारचा स्कर्ट घालतात. ज्याला स्थानिक भाषेत सारोंग असं म्हणतात. म्यानमारमध्ये अशी मान्यता आहे की, जो पुरूष महिलेच्या या सारोंग खालून जातो त्याचं पौरूषत्व नष्ट होतं. हेच कारण आहे की, मिलिट्रीला रोखण्यासाठी महिला सारोंगचा वापर करत आहेत.
काही प्रदर्शनकर्त्याचं मत आहे की, सैनिक सारोंगला घाबरतात. रस्त्यावर प्रदर्शन करत असलेल्या लोकांवर म्यानमार सुरक्षा दलाने कठोर कारवाई केली आहे. यानंतर लोकांनी आपल्या रहिवाशी भागांमध्येच प्रदर्शन सुरू केलं. या भागात सैनिक पोहोचू नये म्हणून घरांबाहेर महिलांचे सारोंग लटकवण्यात आले.
(Image Credit : Reuters)
असंही सांगितलं जात आहे की, अनेक ठिकाणी सारोंगचा प्रभावही बघायला मिळाला. तर काही ठिकाणी सैनिकांनी सारोंग खाली काढले आणि पुढे जात राहिले. दरम्यान प्रदर्शनकर्ते देशाला लोकशाही बहाल करण्याची आणि आपली नेता आंग सान सू ची यांची सुटका करण्याची मागणी करत आहे. तर सेनेने निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप करत देशाची सत्ता आपल्या हाती घेतली आहे.