‘म्यानमारमधील हिंदुंच्या हत्यांची चौकशी हवी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:40 AM2018-05-26T00:40:39+5:302018-05-26T00:40:39+5:30

म्यानमारच्या अशांत उत्तर रखाईन प्रांतात झालेल्या या मानवीहक्क उल्लंघनाची स्वतंत्र आणि विश्वसनीय चौकशी होण्याची गरज असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले.

Need inquiry in killing of Hindus in Myanmar | ‘म्यानमारमधील हिंदुंच्या हत्यांची चौकशी हवी’

‘म्यानमारमधील हिंदुंच्या हत्यांची चौकशी हवी’

Next

वॉशिंग्टन : अराकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मीकडून (एआरएसए) हिंदू ग्रामस्थांची हत्या झाल्याचे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात म्हटले असून अमेरिकेने शुक्रवारी या हत्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या अशांत उत्तर रखाईन प्रांतात
झालेल्या या मानवीहक्क उल्लंघनाची स्वतंत्र आणि विश्वसनीय चौकशी होण्याची गरज असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले.
पीडितांना न्याय मिळण्यासाठी व हत्याकांडाची जबाबदारी कोणाची हे निश्चित करण्यासाठी तातडीने विश्वसनीय व स्वतंत्र चौकशीची
गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे व अशा चौकशीला अमेरिकेचा सतत पाठिंबा आहे, असे हा प्रवक्ता म्हणाला.
अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा हा अहवाल या आठवड्याच्या सुरवातीला प्रसिद्ध झाला. त्यात म्हटले आहे की, रोहिंग्यांचा सशस्त्र गट बंदुका व तलवारी नाचवत गेलेला ९९ हिंदुंच्या (महिला, पुरूष व मुले) एका व बहुधा दुसऱ्या हत्याकांडाला जबाबदार आहे. याशिवाय आॅगस्ट २०१७ मध्ये या गटाने हिंदू ग्रामस्थांची अपहरण व हत्याही केली होती. २५ आॅगस्ट, २०१७ रोजी एआरएसएने उत्तर मौंगद्वॉमधील खेड्यात हिंदू समाजावर हल्ला केला.

Web Title: Need inquiry in killing of Hindus in Myanmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.