नेदरलँड : नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रूट पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आले आहेत. संसदेतून बाहेर जात असताना मार्क रूट यांच्या हातातील कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. यावेळी त्यांनी लगेच कॉफीचा कप उचलला आणि स्वत: लादी साफ केली. त्यांच्या या कामाचे सोशल मीडियात कौतुक करण्यात येत आहे. मार्क रूट यांचा सफाई करतानाचा हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मार्क रूट संसदेतील कामकाज आटपून बाहेर जाताना कॉफी पीत जात होते. यावेळी त्यांच्या हातून कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. सांडलेली कॉपी साफ करण्यासाठी येथील महिला कर्मचारी पुढे सरसावली. मात्र, मार्क रूट यांनी कॉफीचा कप उचलला आणि त्या महिलेकडून लादी पुसण्याचे साहित्य घेऊन स्वत: साफसफाई केली. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी त्यांच्या कामाचे टाळ्या वाजवून कौतुक केले. दरम्यान, सोशल मीडियात सुद्धा त्यांच्या या कामाची प्रशंसा करण्यात येत आहे. पाकिस्तानचे पत्रकार हामिद मीर यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कधीतरी पंतप्रधान सफाई कर्मचा-याचे काम करु शकतात. मात्र आपल्याकडे असे होत नाही. फक्त नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्ट रूट हेच सफाई कर्मचारी म्हणून काम करु शकतात. म्हणूनच डच लोकांमध्ये ते लोकप्रिय आहेत. मी त्यांच्या नम्रपणाचा साक्षीदार आहे.
पंतप्रधान जेव्हा कॉफी सांडलेली लादी स्वत:च स्वच्छ करतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 6:15 AM