अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. इथे एका स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका अज्ञात महिलेने दुसऱ्या एका प्रवाशी महिलेला ट्रेनसमोर ढकललं. या धक्क्यानंतर महिला ट्रेनखाली येता येता वाचली, पण तिच्या चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रत्येकजण हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत.
सोमवारी सकाळी अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर सब स्टेशनवर एक अशी घटना झाली ज्याने सर्वांनाच हैराण केलं. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अनेक लोक ट्रेनची वाट बघत उभे होते. ट्रेन जशी प्लॅंटफॉर्मवर येते तशी एका महिला बेंचवरून उठली आणि समोर उभ्या असलेल्या महिलेला तिने ट्रेनकडे ढकललं. या हल्ल्यात ४२ वर्षीय पीडिता सुदैवाने मरता मरता वाचली. पण ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. धक्का देणारी महिला तेथून लगेच जाताना दिसली.
प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या इतर लोकांनी मीडियाला सांगितलं की, अशाप्रकारचे हल्ले येथील प्लॅटफॉर्मवर सामान्य बाब आहे. असे हल्ले ८०च्या दशकात अधिक होत होते. लोक इतके वाईट आहेत की ते काहीही करू शकतात. लोकांनी सांगितलं की, आरोपी महिला काही वेळापासून तिथे बसलेली होती. ती तिच्या हल्ल्याचा प्लन करत असावी. जशी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली तिने समोर उभ्या असलेल्या महिलेला धक्का दिला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.