नायजेरियातील राज्याने नेमला 'आनंद' मंत्रालयाचा मंत्री, विचित्र निर्णयामुळे सर्व जग आश्चर्यचकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 01:44 PM2017-12-07T13:44:24+5:302017-12-07T17:01:44+5:30
राजकीय उलथापालथी, सततची मंदी आणि लोकांमधील असंतोष यामुळे गांजलेल्या नायजेरियाती एका राज्याने एक नवा निर्णय घेतला आहे. आपल्या देशात आनंदासाठी(संतोष, सुख) एक मंत्रालय स्थापन करुन त्यावर एक मंत्रीही नायजेरियाने नेमला आहे.
लेगॉस- राजकीय उलथापालथी, सततची मंदी आणि लोकांमधील असंतोष यामुळे गांजलेल्या नायजेरियाती एका राज्याने एक नवा निर्णय घेतला आहे. आपल्या देशात आनंदासाठी(संतोष, सुख) एक मंत्रालय स्थापन करुन त्यावर एक मंत्रीही नायजेरियाने नेमला आहे. या विचित्र निर्णयामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात असून हे मंत्रालय आणि त्याचे मंत्री नक्की काय काम करणार असा प्रश्न विचारला जात असून ट्वीटरसारख्या समाजमाध्यनावर त्याची खिल्लीही उडवली जात आहे.
Commissioner for Happiness? | Here are 5 other ridiculous things Governor Okorocha has done https://t.co/s5wZv7HS6k via @ynaijapic.twitter.com/XqcGtB0JHn
— Nigeria Newsdesk (@NigeriaNewsdesk) December 5, 2017
आयमो राज्याचे राज्यपाल रोचास ओकोरोचा यांच्या कल्पनेतून 'द कमिशनर फॉर हॅपिनेस अॅंड कपल्स फुलफिलमेंट' नावाचं खातं तयार करण्यात आलेले आहे. ओकोरोचा यांनी सार्वजनिक निधीचा वापर आफ्रिकेतील विविध नेत्यांचे पुतळे उभे करण्यात खर्च केल्याचा त्यांच्यावर पुर्वीपासूनच आरोप आहे. आता त्यांनी या नव्या वादग्रस्त मंत्रीपदी आपल्याच बहिणीला नेमले आहे. ओगेची ओलोलो असे त्यांच्या बहिणीचे नाव आहे. नेमणूक झाल्यावर ओलोलो यांनी या सुख मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. या मंत्रिपदावर येण्यापूर्वी त्य़ा ओकोरोचा यांच्या डेप्युटी चिफ ऑफ स्टाफ आणि राज्यांअंतर्गत विषयांवरील विशेष सल्लागार अशा विविध पदांवर कार्यरत होत्या.
The people of Imo are very happy about the new ministry | Commissioner for Happiness speaks on new job https://t.co/gRxHgzkRrI via @ynaijapic.twitter.com/dJ9R98XWwN
— Nigeria Newsdesk (@NigeriaNewsdesk) December 6, 2017
ओकोरोची यांचे प्रवक्ते सॅम ओनवुमेडो यांनी ओलोलो यांच्या कामाच्या व जबाबदारीबाबत कोणतीही माहिती देणे शक्य नसल्याचे सांगितले आणि या नियुक्तीमध्ये काहीही गैर नसल्याचे स्पष्ट केले आहे. ओकोरोचा हे नायजजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहमंद बुहारी यांच्या ऑल प्रोग्रेसिव्हज कॉंग्रेस पार्टीचे महत्त्वाचे सदस्य असून ते विविध विवादांमुळे नायजेरियात आणि आफ्रिकेच प्रसिद्ध आहेत. विविध सरकारी पदांवरती आपल्या घरातील सदस्यांना नेमण्याच्या त्यांच्या निर्णयांमुळे सतत टीका होत असते. चीफ ऑफ स्टाफपदी त्यांनी आपल्या जावयाला नेमले आहे.
काही महिन्यांपुर्वीच त्यांनी लायबेरियाचे मावळते राष्ट्राध्यक्ष एलेन जॉन्सन सिरलिफ आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचे आपल्या राज्यात पुतळे बांधले आहेत. झुमा यांच्या पुतळ्याला 14 लाख डॉलर्सचा खर्च झाल्याचे सांगण्यात येेत.