अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आधीपासूनच प्रसारमाध्यमांनी आवाज उठवायला सुरुवात केली असताना आता सोशल मिडियानेही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसबाबत भ्रामक पोस्ट टाकल्याप्रकरणी फेसबुकने ट्रम्प यांची पोस्टच उडविली आहे.
कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्याप्रमाणावर होत आहे. यासाठी फेसबुकने अफवांवर एक योजना बनविली असून अशा भ्रामक पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे. आज त्याच्या प्रत्यय डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील आला आहे. लहान मुले कोरोना व्हायरसशी लढण्यास आधीपासूनच सक्षम असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. फॉक्स न्यूजवर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले होते. याचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला. ही पोस्ट फेसबुकने डिलीट केली आहे. यावर फेसबुकने स्पष्टीकरण देताना एक गट कोरोना व्हायरसशी लढण्यास म्हणजेच त्याची प्रतिकारशक्ती अधिक असल्याचा दावा करणे आमच्या पॉलिसीविरोधात आहे. अशा प्रकारची माहिती ही कोरोनासंबंधी चुकीची माहिती पसरविते. यामुळे हे पोस्ट डिलीट करण्यात येत आहे.
धक्कादायक म्हणजे फेसबुकसारखीच ट्विटरनेही कारवाई केली आहे. याच पोस्टवरून ट्विटरने ट्रम्प यांच्या प्रचाराचे अकाऊंट काही काळासाठी ब्लॉक केले आहे. ट्रम्प यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. ट्विटरने ट्रम्प प्रचाराच्य़ा अकाऊंटला हे ट्विट डिलीट करण्यास सांगितले आहे. तोपर्यंत या अकाऊंटवरून कोणतेही नवीन ट्विट पोस्ट करता येणार नाहीय. अशाप्रकारचे पाऊल ट्विटर अन्य पोस्टबाबतही उचलते. यासाठी युजरला ते वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यास सांगितले जाते. वेगवान कारवाई करण्याबाबत फेसबुक खूप मागे आहे.
अनेक अभ्यासांमध्ये मुलांना कोरोनाची बाधा कमी प्रमाणात होते किंवा ते वृद्धांपेक्षा जास्त ताकदवर आहेत असे म्हटले आहे. मात्र, ते सिद्ध करता आलेले नाही. ट्रम्प यांची पोस्ट मुलांमधील कोरोना व्हायरसच्या प्रतिकारशक्तीवर होती. यामुळे ती पोस्ट डिलीट करण्यात आली.
अन्य़ महत्वाच्या बातम्या...
Reliance चा अटकेपार डंका; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात
Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार
Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...
कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू
आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका