उत्तर कोरियात चीनकडून येतंय "कोरोना धुळी"चं वादळ, किम जोंग उनने दिला "हा" आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 12:48 PM2020-10-24T12:48:46+5:302020-10-24T13:03:51+5:30
North Korea Yellow Dust : कोरियामध्ये चीनकडून पिवळ्या धुळीचे वादळ धडकणार आहे. उत्तर कोरियाच्या प्रशासनाने या वादळामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली आहे.
प्योंगयांग - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान उत्तर कोरियामध्ये आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. कोरियामध्ये चीनकडून पिवळ्या धुळीचे वादळ धडकणार आहे. उत्तर कोरियाच्या प्रशासनाने या वादळामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच कोरोना संसर्गाचा हा धोका लक्षात घेता नागरिकांना घरातच दारं खिडक्या बंद करून राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. उत्तर कोरियाने कोरोनाने एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा केला आहे.
कोरोना व्हायरस हा हवेतूनही पसरू शकतो. एनके न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी प्योंगयांगच्या रस्त्यावर शुकशुकाट होता. त्यामुळे नागरिकांनी किम जोंग उनने दिलेल्या सूचनांचे, आदेशाचे पालन केले असल्याचं दिसून आलं आहे. उत्तर कोरियाचे सरकारी वृत्तपत्र रोडोंग सिन्मूनने दिलेल्या वृत्तानुसार, या 'यलो डस्ट'मध्ये मानवी शरीराला अपायकारक घटक आहेत. या घटकांमुळे श्वसन यंत्रणेवर परिणाम होतो. जगभरात कोरोनाचा हवेतून होत असलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.
"कोरोना धुळी"चे वादळ, किम जोंग उनने दिला "हा" आदेश
कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याशिवाय घराबाहेर पडताना मास्कचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ही पिवळी धूळ घरात येऊ नये यासाठी दारे खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रशियन कोरोनाचा संसर्ग हवेतून पसरत नसल्याचं सीडीसीने स्पष्ट केलं आहे. हवेतून कोरोनाचा संसर्ग काही अंतरापर्यंतच फैलावू शकतो, असेही याआधी अनेक संशोधकांनी म्हटलं आहे. मात्र उत्तर कोरियात आवश्यक काळजी घेण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारत, रशिया आणि चीनवर साधला निशाणा, म्हणाले...https://t.co/B8NiR1sfWz#DonaldTrump#America#Indiapic.twitter.com/Oy9jy3ah70
— Lokmat (@MiLOKMAT) October 23, 2020
कोठे-कोठे होते चीनी हेर?, हेरगिरांच्या टीममध्ये कोलकात्यातील एका महिलेचाही समावेश https://t.co/ITg7T7UH3w#India#China#NarendraModi
— Lokmat (@MiLOKMAT) October 21, 2020