जपानच्या चिंतेत वाढ, उत्तर कोरियानं पुन्हा डागल्या दोन मिसाइल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 08:56 PM2019-05-09T20:56:36+5:302019-05-09T20:59:14+5:30
उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टिक मिसाइलचं परीक्षण घेतलं आहे.
सेऊल- उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टिक मिसाइलचं परीक्षण घेतलं आहे. दक्षिण कोरियानं उत्तर कोरियावर जवळच्या टप्प्यातल्या (शॉर्ट रेंजच्या) दोन बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी घेतल्याचा आरोप केला आहे. उत्तर कोरिया लागोपाठ स्वतःचा शस्त्रास्त्रांचा साठा वाढवत असून, त्यांनी आपल्या भागात होणाऱ्या हालचालींवरही निगराणी ठेवण्यात सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियाच्या दाव्यानुसार या मिसाइल्स 270 ते 420 किमी दूरपर्यंत मारा करू शकतात.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेची सेना संयुक्तरीत्या याचं विश्लेषण करत आहेत. उत्तर कोरियानं पुन्हा मिसाइलचं परीक्षण सुरू केल्यानं कोरियन द्वीपकल्पात पुन्हा तणाव वाढू शकतो. अमेरिकेबरोबर झालेली आण्विक चर्चा फिस्कटल्यानंतर उत्तर कोरियाचे हुकूमशाह किंग जोंग ऊन वारंवार मिसाइलचं परीक्षण करत आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयानंही उत्तर कोरियानं मिसाइलचं परीक्षण केल्याची पुष्टी केली आहे. परंतु कोणतीही मिसाइल आमच्या भागात पडली नसल्याचाही खुलासा केला आहे.
जपानच्या सुरक्षेला सध्या कोणताही धोका नाही, असंही जपानकडून सांगण्यात आलं आहे. दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या दाव्यानुसार, उत्तर कोरियाची बॅलेस्टिक मिसाइल त्यांच्या लष्कराचं तळ असलेल्या सिनोरीवर पडली आहे. तर दुसरी मिसाइल कुसाँगवर डागण्यात आली आङे. कुसाँग भूभागात उत्तर कोरियानं अनेक मिसाइल परीक्षण केलेले आहेत.