बीजिंग, दि. 12 - भारताच्या दबावानंतर चीननं सिक्कीममधल्या डोकलाममधून माघार घेतल्यानंतर चीननं नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय भाविकांसाठी नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याच्या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असंही चीननं म्हटलं आहे.
डोकलाममधील संघर्षानंतर नाथू लामधील रस्ता बंद करण्यात आला होता. त्यानंतर तो रस्ता पुन्हा खुला करण्यास चीननं सहमती दर्शवली आहे. चीन नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्यासह भारतीय तीर्थक्षेत्राला जाणा-या भाविकांसह इतर मुद्द्यांवरही भारतासोबत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी दिली आहे. भारत व चीनमध्ये गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ डोकलाम सीमेवरून संघर्ष सुरू होता. परंतु चीन व भारतानं एकत्र सैन्य माघारी घेतल्यानं या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. ....असा जातो नाथू ला मार्ग2015मध्ये चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी नाथू ला खिंडीतील मार्ग खुला केला होता. हा मार्ग तिबेटमार्गे नाथू ला खिंडीतून जातो. हिमालयातील सिक्कीम नाथू ला मार्ग समुद्र सपाटीपासून 4 हजार मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी अधिक भारतीय यात्रेकरू या मार्गानं जाऊ शकत होते. सध्याचा मार्ग लिपुलकेश खिंडीतून जात असून, 2013 साली उत्तराखंडात आलेल्या भीषण पुरात हा मार्ग खराब आणि नादुरुस्त झाला होता.(सीमेवरून लष्कर हटवा अन्यथा मानसरोवरचा रस्ता बंद, चीनची भारताला धमकी)(चीन म्हणते, आम्ही नव्हे, भारतानेच केली घुसखोरी!)उत्तराखंड आणि नेपाळमार्गे कैलासकडे जाणारा मार्ग नैसर्गिक रचनेमुळे अवघड आहे, या मार्गावर बराच प्रवास खेचराच्या पाठीवर बसून करावा लागतो. याची कल्पना असल्याने पंतप्रधान मोदी यांनी कैलास यात्रेसाठी दुसऱ्या मार्गाचा प्रस्ताव मांडला होता. नाथू ला खिंडीतून जाणाऱ्या नव्या मार्गामुळे कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना 1500 किमीच्या मार्गापर्यंत बसने जाता येत होते. हा नवा मार्ग सुरू करण्यासाठी तिबेटी लोकांनी बरीच तयारी केली होती. या 1 हजार यात्रेकरूना दरवर्षी परवाना दिला जातो. 18 तुकड्यांत हे लोक यात्रेसाठी पाठवले जातात. ही संपूर्ण यात्रा 23 दिवसांची असून 19 दिवस प्रवासात तर चार दिवस वैद्यकीय तपासणीसाठी असतात. यात्रेचा एकूण खर्च दर माणसी 1.80 लाख रुपये येतो.