Coronavirus:...तर जगातून ‘Covid 19’ महामारी पूर्णत: नष्ट होईल; नव्या रिपोर्टमधून आली सर्वांना सुखावणारी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:50 PM2021-08-11T13:50:49+5:302021-08-11T13:54:55+5:30

अलीकडेच ब्रिटीश मेडिकल जर्नल ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण कशारितीने जगातून नष्ट करू शकतो याबाबत स्पष्टपणे उपाय सांगण्यात आले आहेत.

Now a new study suggests that it might be possible to eradicate the Coronavirus from the Earth | Coronavirus:...तर जगातून ‘Covid 19’ महामारी पूर्णत: नष्ट होईल; नव्या रिपोर्टमधून आली सर्वांना सुखावणारी माहिती

Coronavirus:...तर जगातून ‘Covid 19’ महामारी पूर्णत: नष्ट होईल; नव्या रिपोर्टमधून आली सर्वांना सुखावणारी माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देस्मॉलपॉक्स आणि पोलिओच्या तुलनेत कोविड १९ संपुष्टात आणणं खूप सोप्पं आहे.कोविड १९ ला संपुष्टात आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे राजकीय इच्छाशक्ती, आर्थिक गुंतवणूक आणि सुरक्षा. स्मॉलपॉक्स, पोलिओच्या तुलनेत कोविड १९ लसीबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे.

नवी दिल्ली - मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना महामारीचं संकट उभं राहिलं आहे. या महामारीनं लाखो लोकांचे जीव घेतले. आजही अनेकजण कोरोनामुळे संक्रमित आहेत. कोरोना विषाणूमध्ये होणाऱ्या बदलांमुळे जगातील अनेक वैज्ञानिक चिंतेत आहेत. परंतु कोरोना विषाणूवर आलेल्या नव्या रिपोर्टमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जगातून कोविड १९(Covid 19) आजार पूर्णपणे संपुष्टात आणला जाऊ शकतो असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

अलीकडेच ब्रिटीश मेडिकल जर्नल ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण कशारितीने जगातून नष्ट करू शकतो याबाबत स्पष्टपणे उपाय सांगण्यात आले आहेत. या स्टडीत १७ फॅक्टर आहेत ज्याच्या आधारे कोरोना संक्रमण पसरण्यापासून रोखलं जाऊ शकतं असं म्हटलं आहे. त्याचसोबत कोविड १९ रोखण्यासाठी ज्या पद्धती सांगितल्या आहेत त्या किती प्रॅक्टिकल आहेत याबाबतही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

या १७ फॅक्टरमध्ये तंत्रज्ञान विकास, सुरक्षता, प्रभावी लसीकरण आणि दिर्घकाळ इम्युनिटी कायम राखण्याचे फॅक्टर्स सांगितले आहेत. त्याशिवाय सामाजिक, राजकीय आणि आर्थिक फॅक्टर्सचाही समावेश करण्यात आला आहे. ज्यात सरकारने प्रभावी निर्बंध आणि लोकांद्वारे संक्रमण थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि ते समजून पडताळणी करण्यात आली आहे. हे सर्व फॅक्टर्स तीन केंद्र बिंदू प्रणालीवर रेटिंग केले आहे. ही प्रणाली विकसित केल्यानं कोविड १९ नष्ट होणार की नाही हे समजू शकतो. नष्ट होणार याचा अर्थ जगात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या शून्य होईल. आतापर्यंत फक्त स्मॉलपॉक्स(Smallpox) आणि पोलिओ (Polio Virus) या व्हेरिएंटवर असं यश मिळालं आहे.

रिपोर्टमध्ये असं आढळलं की, स्मॉलपॉक्स आणि पोलिओच्या तुलनेत कोविड १९ संपुष्टात आणणं खूप सोप्पं आहे. रेटिंगनुसार, स्मॉलपॉक्सचा स्कोअर २.७, कोविड १.६ तर पोलिओ १.५ आहे. आमची गणना प्राथमिक स्वरुपातील आहे. ज्यात अनेक फॅक्टर्सचा विचार करण्यात आला आहे. कोविड १९ ला जगातून नष्ट करता येऊ शकते परंतु त्यासाठी कठीण प्रयत्न करावे लागतील तेदेखील अनेक वर्षासाठी असावेत. कोविड १९ ला संपुष्टात आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे राजकीय इच्छाशक्ती, आर्थिक गुंतवणूक आणि सुरक्षा. जर हे ३ फॅक्टर्स एकत्र आले तर कोविड १९ रोखू शकतो. एक टप्पा संपवूही शकतो. परंतु हे सोप्पं नाही. कारण लॉग्न कोविडची समस्या कायम आहे. म्हणजे कोविड संक्रमणातून बरे होऊनही लोकांमध्ये कोविडची लक्षणं आढळून येत आहेत. स्मॉलपॉक्स, पोलिओच्या तुलनेत कोविड १९ लसीबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. जे जास्त धोकादायक आहे. वॅक्सिन न लावण्याच्या गोंधळामुळे व्हेरिएंटसचा धोका वाढू शकतो. वारंवार नवीन संक्रमण तयार होत राहतील. त्यामुळे लोकांच्या इम्यूनिटीवर त्याचा परिणाम होत आहे. जर हीच अवस्था कायम राहिली तर जागतिक लसीकरण कार्यक्रमावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्याचसोबत सर्वात मोठे आव्हान आहे की, लसीकरण आणि आरोग्य सुविधेत अत्याधुनिक आणि प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी निधीची आवश्यकता भासेल. नवीन लसींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च आहे. याठिकाणी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय मदतीची गरज आहे. कारण विविध विविध देशांकडून सुरू असणाऱ्या विज्ञान विरोधी व्यवहारांना आळा घालता येईल. कारण लसीचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर करणं अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे संपूर्ण मानवसृष्टीला त्याचा फायदा होईल.

दरम्यान, कोविड १९ संपुष्टात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना किंवा अनेक देशांनी एकत्र येत बनवलेल्या आरोग्य संघटनेने पुढाकार घ्यावा. जर असं झालं नाही तर एक लस केवळ एकाच देशाला मिळेल तर दुसऱ्या देशाला ती खरेदी करून अथवा मागणी करून लोकांना द्यावी लागेल. त्यापेक्षा जो देश सक्षम आहे त्यांनी लसीचं उत्पादन करून दुसऱ्या देशांना मदत करावी असंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

Web Title: Now a new study suggests that it might be possible to eradicate the Coronavirus from the Earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.