अमेरिकेचा व्हिसा मंजूर झाल्यावर विमानात प्रवेश करण्याची परवानगी मिळते का?

By कुणाल गवाणकर | Published: October 24, 2020 11:37 AM2020-10-24T11:37:48+5:302020-10-24T11:47:52+5:30

US Visa: अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय अमेरिकेचे कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शन अधिकारी घेतात. प्रवासी किती दिवस अमेरिकेत राहू शकतो, याचा निर्णय घेण्याचा अधिकारदेखील त्यांनाच असतो.

Once I have an approved visa will I be allowed to board the flight | अमेरिकेचा व्हिसा मंजूर झाल्यावर विमानात प्रवेश करण्याची परवानगी मिळते का?

अमेरिकेचा व्हिसा मंजूर झाल्यावर विमानात प्रवेश करण्याची परवानगी मिळते का?

Next

प्रश्न- मला व्हिसा मंजूर झाल्यावर मला अमेरिकेला जाणाऱ्या विमानात प्रवेश करण्याची परवानगी मिळते का?

उत्तर- अमेरिकेचं नागरिकत्व आणि वास्तव्याचा दर्जा पाहून काही एअरलाईन्स विमानात प्रवेश देत नाहीत. अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांनी थेट व्यवसायिक विमान कंपन्यांशी संपर्क साधावा. अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासाला याबद्दल कोणताही अधिकार नाही. अमेरिकेला जाण्यासाठी प्रवास करता यावा यासाठी दूतावास कोणतंही प्रमाणपत्र देत नाही.

अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे अमेरिकेचा वैध व्हिसा, वैध ग्रीन कार्ड आणि वैध पासपोर्ट असायला हवा. तुमचा व्हिसा नेमका कधीपर्यंत वैध आहे, याची तारीख तुम्ही व्हिसावर तपासू शकता. अमेरिकेचे इमिग्रेशन कायदे पाहता वैध व्हिसाच्या आधारावर प्रवाशाला अमेरिकेत प्रवेश मिळेलच याची खात्री देता येत नाही. व्हिसामुळे प्रवाशाला अमेरिकेच्या सीमेपर्यंत पोहोचता येतं. मात्र अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय अमेरिकेचे कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शन अधिकारी घेतात. प्रवासी किती दिवस अमेरिकेत राहू शकतो, याचा निर्णय घेण्याचा अधिकारदेखील त्यांनाच असतो.
राष्ट्राध्यक्षांनी केलेली घोषणा तुम्ही अमेरिकेत आल्यानंतर १४ दिवसांसाठी लागू आहे. शेंगन प्रांतासाठीदेखील हा नियम लागू आहे. राष्ट्राध्यक्षांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या घोषणांची माहिती https://www.whitehouse.gov/presidential-actions/ वर उपलब्ध आहे.

अमेरिकेला पोहोचण्याआधी प्रवाशांनी प्रत्येक राज्याच्या कोविड संबंधित मार्गदर्शक सूचना लक्षात घ्याव्या. क्वारंटिन आणि सेल्फ आयसोलेशनचे नियम राज्यांनुसार बदलतात. प्रत्येक राज्यानं प्रवेशाच्या नियमावलीची माहिती संकेतस्थळावर दिली आहे. क्वारंटिन आणि चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनच्या संकेतस्थळाला (cdc.gov) भेट द्या.

अमेरिकेत प्रवेश केल्यावर प्रवाशांचं स्क्रीनिंग केलं जातं. त्यावेळी त्यांना तिथे वैद्यकीय इतिहास, सध्याची परिस्थिती आणि स्थानिक आरोग्य यंत्रणेबद्दलच्या संपर्काबद्दलची माहिती विचारली जाते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

नियमावली आणि मार्गदर्शक सूचना कधीही बदलू शकतात याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. प्रवासाबद्दलच्या मार्गदर्शक सूचनांची अपडेटेड माहिती जाणून घेण्यासाठी travel.state.gov ला भेट द्या आणि भारताशी संबंधित नियमावली जाणून घेण्यासाठी in.usembassy.gov/covid-19-information/ ला भेट द्या.

Web Title: Once I have an approved visa will I be allowed to board the flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.