लंडन : भारतासह जगभरातील विविध देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तर या कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम सुद्धा राबविली जात आहे. मात्र, कोरोनावरील लस घेतल्यानंतरही अनेकांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता कोरोनावरील लस अधिक प्रभावी करण्यासाठी ऑक्सफोर्ड विद्यापीठाने (Oxford University) नव्याने तयारी सुरू केली आहे. यानुसार, अशा लोकांच्या शरीरात जिवंत व्हायरस घातला जाणार आहे, जे आधी कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, ऑक्सफोर्ड विद्यापीठाने एस्ट्राजेनेकासोबत मिळून कोरोनावरील लस तयार केली आहे. जी भारतात कोव्हिशिल्ड म्हणून ओळखली जाते.
न्यूज एजन्सी ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, ऑक्सफोर्ड विद्यापीठात संशोधन करणारे शास्त्रज्ञ अशा 64 निरोगी वॉलेंटिअरचा शोध घेत आहेत, ज्यांनी यापूर्वी कोरोनावर मात केली आहे. अशा लोकांचे वय 18-30 वर्षे यादरम्यान असले पाहिजे. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार या सर्व लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरसचा वुहान स्ट्रेन घातला जाणार आहे. दरम्यान, 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसची प्राथमिक प्रकरणे दिसून आली होती.
कशी केली जाणार स्टडी?ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मते, ज्या 64 लोकांच्या शरिरात कोरोना व्हायरसचा स्ट्रेन पुन्हा घातला जाईल, त्या लोकांना 17 दिवस क्वारंटाईन ठेवले जाणार आहे. तसेच, या स्टडीचा अहवाल काही महिन्यांत येईल, असे म्हटले जात आहे. याचा परिणाम शास्त्रज्ञांना अधिक प्रभावी लस तयार करण्यात मदत करेल. याव्यतिरिक्त हे देखील समजेल की, कोरोना व्हायरसचा संसर्ग एखाद्या रुग्णात पुन्हा किती दिवस होत आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, 10 टक्के प्रौढांमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग पुन्हा होत आहे.
(Coronavirus: ब्रिटन, ब्राझील नाही! राज्यात ५० टक्के काेरोनाबाधितांमध्ये आढळला भारतीय प्रकारचा विषाणू)
शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंताया स्डटीनुसार हे समजेल की, कोणत्या व्यक्तीला पुन्हा सरासरी किती दिवसांनंतर व्हायरसची लागण होत आहे. स्टडीच्या दुसर्या टप्प्यात, रुग्णांच्या भिन्न गटाची तपासणी केली जाईल आणि त्यांच्या प्रतिकारशक्तीची स्टडी केली जाईल, असे ऑक्सफोर्डने असे म्हटले आहे. दरम्यान, एखाद्याच्या शरीरात पुन्हा व्हायरस घातल्यास जोखीम वाढण्याची शक्यता आहे, असे सांगत जगातील अनेक शास्त्रज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, जास्त काळ शरीरावर त्याचा काय परिणाम होईल, याबद्दल काहीही माहिती नाही, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.