काबूल : अजिंक्य असलेला पंजशीर (Panjashir) तालिबानच्या (Taliban) ताब्यात येण्यासाठी अफगाणिस्तान (AFghanistan) ताब्यात घेण्यासाठी छुपी मदत करणाऱ्या पाकिस्तानने (Pakistan) आता थेट उघड उघड उडी घेतली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या साह्याने अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या घरासह अन्य ठिकाणी बॉम्बफेक केली आहे. पंजशीरने शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला आहे, परंतू तो तालिबानने फेटाळल्याचे समजते आहे. (Pakistani Air Force drones bombing attack on Panjshir Valley)
Afghanistan: पंजशीरच्या अहमद मसूदला तगडा झटका; तालिबानच्या हल्ल्यात फहीम दश्ती ठार
अफगाणिस्तानचे सामंगन प्रांताचे माजी खासदार जिया अरियनजादो यांनी याची माहिती दिली आहे. दुसरीकडे तालिबान आणि पंजशीर लढवय्ये आपापले दावे करत आहेत. रविवारी एका हल्ल्यात पंजशीरच्या सिंहाचा मुलगा अहमद मसूद याचा महत्वाचा सहकारी या लढ्यात मारला गेला आहे. पंजशीरमध्ये तालिबानी दहशतवादी आणि विरोधी गट रेझिस्टंस फ्रंट यांच्यात जोरदार युद्ध सुरु आहे. एकेकाळी हा प्रांत रशियाच्या सैन्यालाही जिंकता आला नव्हता. रशियाच्या रणगाड्यांचे भग्नावषेश आजही तेथील रस्त्यांच्या कडेला त्या घणघोर युद्धाची साक्ष देतात. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे.
पंजशीर लवकरात लवकर ताब्यात येण्यासाठी तालिबानच्या मदतीला आता पाकिस्तान आले आहे. हवाई हल्ल्यांनी तेथील नेत्यांच्या घरांवर हल्ले करायचे, कमांडरना ठार करायचे आणि पंजशीर योद्ध्यांचे खच्चीकरण करायचे असा डाव पाकिस्तानने आखला आहे. यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून पाकिस्तानच्या आयएसआयचे प्रमुख काबुलमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांच्या या उपस्थितीमुळे काहीतरी वेगळे घडणार आसल्याचे कयास बांधले जात होते. आजच्या या हवाई हल्ल्यांमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सावधान! अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या सामर्थ्यानं भारताला धोका; CIA च्या माजी अधिकाऱ्याचा दावा
तालिबानच्या दाव्यानुसार त्यांनी पंजशीर घाटीवर ताबा मिळविला आहे. तर रेझिस्टंस फ्रंटचा दावा आहे की अद्याप पंजशीरवर त्यांचाच ताबा आहे. तालिबानचे 1000 हून अधिक दहशतवादी पंजशीरमध्ये मारले गेले आहेत. त्यातच हक्कानी नेटवर्क आणि तालिबानमध्ये सत्तेतील वाट्यावरून भांडणे सुरु असून एका बैठकीत गोळीबारही झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शनिवारी सत्तास्थापनेचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून हवाई हल्ले सुरुअफगाणिस्तानच्या मिडीयानुसार पाकिस्तानी हेलिक़ॉप्टर आणि ड्रोन विमाने पंजशीरच्या घाटीमध्ये सातत्याने बॉम्बहल्ले करत आहेत. अमरुल्ला सालेह यांच्या घरावरही बॉम्बफेक करण्यात आली. यामुळे सालेह पंजशीरच्या डोंगररांगांमध्ये अज्ञात ठिकाणी लपले आहेत.