इस्लामाबात -पाकिस्ताननेही नेपाळच्या पावलावर पाऊल टाकले आहे. पाकिस्तानातीलइम्रान खान सरकारने वादग्रस्त नकाशाला मंजुरी दिली आहे. या नकाशात पाकिस्तानने पूर्ण काश्मीर आपला असल्याचे दाखवले आहे. यापूर्वी पाकिस्तान केवळ पीओकेच आपला असल्याचे म्हणत होता. मात्र, आता नव्या नकाशात त्यांनी संपूर्ण काश्मीरचाच समावेश केला आहे. एवढेच नाही, तर पाकिस्तानने या नव्या नकाशात लडाख, सियाचीनसह गुजरातमधील जुनागडवरही दावा सांगितला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, पाकिस्तानच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. या नकाशाला इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर इम्रान खान यांनी नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला.
पाकिस्तानपूर्वी नेपाळनेही अशीच कुरापत केली आहे. त्यांनीही वादग्रस्त नकाशाला मंजुरी दिली आहे. यात भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा या भागांवर नेपाळने आपला अधिकार सांगितला आहे. हा नकाशा नेपाळने 20 मेरोजी जारी केला होता. याला तेथील संसदेनेही मंजुरी दिली आहे. आता नेपाळ हा वादग्रस्त नकाशा संयुक्त राष्ट्र संघाला (UNO), गूगलला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पाठवण्याची तयारी करत आहे.
पाकिस्तानने हा वादग्रस्त नकाशा जम्मू आणि कश्मीरचे कलम 370 हटविण्याला बरोबर एक वर्ष होण्याच्या एकदिवस आधीच जारी केला आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 हटवण्यात आले होते. मोदी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचा थयथयाटही दिसून आला होता. त्याने जगासमोर रडगाणे गायलाही सुरुवात केली होती आणि आता पाकिस्तानी जनतेला खूश करण्यासाठी हा नवा वादग्रस्त नकाशा तयार केला आहे. यातच, परराष्ट्रमंत्री शाह महेमूद कुरैशी म्हणाले, की हा नवा नकाशा शाळेच्या पाठ्यपुस्तकांतही समाविष्ट करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...