पाकिस्तानची सरकारी वेबसाइट हॅक, तिरंग्यासह लिहिलं जन-गण-मन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 06:13 PM2017-08-03T18:13:50+5:302017-08-03T18:15:00+5:30
पाकिस्तानची सरकारी वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. वेबसाइट हॅक करून हॅकर्सनं भारताच्या स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
इस्लामाबाद, दि. 3 - पाकिस्तानची सरकारी वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. वेबसाइट हॅक करून हॅकर्सनं भारताच्या स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही अज्ञात हॅकर्सनं पाकिस्तानची सरकारी वेबसाइट हॅक करत त्यावर भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवसांच्या शुभेच्छांसह भारताचं राष्ट्रगीत पोस्ट केलं आहे. ही घटना आजच घडली आहे.
सोशल मीडिया सल्लागार हर्ष मेहता यांनी याची ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. त्यांनी लिहिलं आहे की, वेबसाइट www.pakistan.gov.pk हॅक झालीय. हॅक करून पाकिस्तानच्या वेबसाइटवर 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. मीडिया रिपोर्टनुसार, वेबसाइट दुपारी 2.45 वाजण्याच्या दरम्यान हॅक करण्यात आली. मात्र त्यानंतर ती वेबसाइट पुन्हा पूर्ववत करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वीही पाकिस्तानी सरकारची वेबसाइट हॅक झाली होती. त्यावेळी जवळपास 30 पाकिस्तानी वेबसाइट हॅक करण्यात आल्या होत्या.
https://t.co/M45xALMu3A HACKED!
— Harsh Y Mehta (@harshf1) August 3, 2017
Indian National Anthem being played on the website! #India#Pakistanpic.twitter.com/6nMBcdgLhm