Imran Khan Calls Bill Gates: इम्रान खान यांनी अफगाणिस्तानसाठी थेट बिल गेट्स यांच्याकडे मागितली मदत, म्हणाले माणुसकी खूप गरजेची!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 10:06 AM2021-10-07T10:06:20+5:302021-10-07T10:07:13+5:30
Imran Khan Calls Bill Gates: पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) खूप चिंताग्रस्त झाले आहेत.
पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) खूप चिंताग्रस्त झाले आहेत. इम्रान खान यांनी आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. माणुसकीच्या नात्यातून अफगाणिस्तानला आर्थिक सहाय्य करा अशी विनंती इम्रान खान यांनी बिल गेट्स यांच्याकडे केली आहे. १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानात तालिबाननं कब्जा केला आहे. तेव्हापासून अफगाणिस्तानला होणारा अर्थपुरवठा विविध कारणांमुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती खूप डबघाईला आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार इम्रान मलिक यांनी बिल गेट्स यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला. गेट्स सध्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष आहेत. इम्रान खान यांनी यावेळी पोलिओचं समूळ उच्चाटन करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांबाबत गेट्स यांच्याशी चर्चा केली. यासोबत पाकिस्तानमधील कुपोषणाचा आकडा कमी करण्यासाठी आणि वित्तीय सेवांसाठी गेट्स यांच्या संस्थेकडून होणाऱ्या मदतीबाबतही चर्चा केली.
पाकिस्तानच्या जिओ टीव्हीच्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी फोनवरुन पंतप्रधान इम्रान खान यांनी गेट्स यांच्याशी संपर्क केला. यात अफगाणिस्तान या युद्धग्रस्त देशात अर्ध्याहून अधिक लोकसंख्या गरीबी रेषेच्या खाली गेली असल्याचं सांगितलं. त्यांना अर्थसाहय्याची खूप गरज आहे. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार इम्रान यांनी अफगाणिस्तानच्या आरोग्य प्रणालीबाबतही गेट्स यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या दाव्यानुसार जगात अजूनही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पोलिओचा धोका कायम आहे.
तालिबानसोबत चर्चा हाच एकमेव मार्ग
अफगाणिस्तानात शांती आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी तालिबानसोबत चर्चा हाच सर्वोत्तम मार्ग आहे असं इम्रान खान यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. महिलांचे अधिकार आणि विशिष्ट पद्धतीनं सरकार चालवण्यासंदर्भात तालिबानसोबत चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, असंही ते म्हणाले. तालिबानला थोडा वेळ देण्याची गरज आहे. त्यांना मदत मिळाली नाही, तर ते पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही खान यांनी व्यक्त केली.