पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये 100 वर्षे जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला; दरवाजे, पायऱ्यांची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 03:24 PM2021-03-29T15:24:09+5:302021-03-29T15:34:25+5:30

Pakistan Rawalpindi Hindu Temple : पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे.

pakistan rawalpindi hundred year old hindu temple attacked by unidentified people | पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये 100 वर्षे जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला; दरवाजे, पायऱ्यांची केली तोडफोड

पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये 100 वर्षे जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला; दरवाजे, पायऱ्यांची केली तोडफोड

Next

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंदू समुदायाच्या मंदिरावर (Hindu Temple) हल्ले सुरूच आहेत. मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात 100 वर्षाहून अधिक जुन्या हिंदू मंदिरावर काही अज्ञात व्यक्तिंनी हल्ला केला. पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. तक्रारीनुसार, हा हल्ला शनिवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास करण्यात आला. 10 ते 15 लोकांच्या समुहाने मंदिरावर अचानक हल्ला केला. मुख्य दरवाजासह अन्य दरवाजे आणि पायऱ्या देखील तोडण्यात आल्या आहेत. 

हिंदू मंदिर तोडफोडीबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार, इवॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी) उत्तर झोनचे सुरक्षा अधिकारी सय्यद रझा अब्बास झैदी यांनी रावळपिंडीच्या बन्नी ठाण्यात या हल्ल्याची तक्रार नोंदवली आहे. मागील एक महिन्यापासून या मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. मंदिरासमोर काही अतिक्रमण करण्यात आले होते. त्याला 24 मार्च रोजी हटवण्यात आले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

मंदिरात धार्मिक कार्य, पूजा-उपासना सुरू झाली नव्हती. त्याशिवाय कोणत्याही देवाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती असं देखईल म्हटलं आहे. तसेच मंदिरावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मंदिराजवळ अतिक्रमण करणाऱ्यांनी दुकाने सुरू केली होती. बऱ्याच कालावधीपासून हे अनधिकृत बांधकाम करून जमिनीवर ताबा मिळवला होता. जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मंदिराजवळील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवले होते. 

मंदिराला अतिक्रमण मुक्त केल्यानंतर नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. या दरम्यान, मंदिराचे प्रशासक ओम प्रकाश यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, मंदिरावर हल्ल्याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता (Myanmar Army) हस्तगत केल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे.  म्यानमारमध्ये शनिवार हा रक्तरंजित दिवस ठरला आहे. लष्कराने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये 144 आंदोलकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

म्यानमारमध्ये रक्तरंजित शनिवार! लष्कराचा आंदोलकांवर बेछूट गोळीबार, तब्बल 144 जणांचा मृत्यू

गेल्या कित्येक आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. बंडखोरीनंतर देशभरातील 44 शहरांत सर्वात मोठा रक्तपात करण्यात आला. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या या रक्तरंजित खेळाने जगाला चिंतेत टाकले आहे. म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सत्ता उलथवण्यात आली होती. म्यानमारच्या लष्कराने देशावर ताबा घेतला होता तसेच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला बेदखल केले होते. आंग सान सू यांच्यासह मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले आहे. यानंतर लोकांमध्ये सैन्याविरोधात उद्रेक पहायला मिळाला. लोक रस्त्यावर उतरले असून आंग सान सू यांना सोडण्याची मागणी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सैन्याने आक्रमक रुप घेत आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे.  

Web Title: pakistan rawalpindi hundred year old hindu temple attacked by unidentified people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.