Mission Shakti: 'मिशन शक्ती'नं पाकमध्ये भूकंप, इम्रान खान यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 07:15 PM2019-03-27T19:15:13+5:302019-03-27T19:46:49+5:30

भारतानं क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती मिळवली आहे.

pakistan reaction on india mission shakti test | Mission Shakti: 'मिशन शक्ती'नं पाकमध्ये भूकंप, इम्रान खान यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

Mission Shakti: 'मिशन शक्ती'नं पाकमध्ये भूकंप, इम्रान खान यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

Next

इस्लामाबाद- भारतानं क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती मिळवली आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्येही खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं जगातल्या इतर देशांकडे भारताविरोधात आवाज उठवण्याचा आग्रह केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. त्या पत्रकात म्हटलं आहे की, पाकिस्तान हा अंतरिक्षाला मानवतेचा वारसा या दृष्टीनं पाहतो. प्रत्येक देशानं अशा हालचालींपासून दूर राहिलं पाहिजे. जेणेकरून अंतरिक्षाचं सैन्यीकरण होणार नाही. गेल्या अनेक काळापासून ज्या देशांनी याविरोधात आवाज उठवला आहे, ते पुन्हा एकदा यासंदर्भात आवाज उठवतील, अशी आशा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केली आहे.

परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात भारताच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. भारतानं मिशन शक्ती फत्ते केल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ही प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही सुरक्षेच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक बोलावली. बैठकीत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल बावजा यांच्यासह अनेक सैन्य अधिकारी उपस्थित होते. 
भारतानं अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे.

भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. भारतानं अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचं नाव कोरलं आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्यानं भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं आहे.

Web Title: pakistan reaction on india mission shakti test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.