इस्लामाबाद: अलीकडेच सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला. त्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला असून, एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने येऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी तर भारतानंतर आता इंग्लंड आणि न्यूझीलंडला शत्रू असल्याचे म्हटले आहे. यातच आता पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करत, एक दिवस असा येईल, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व देशांचे क्रिकेट संघ पाकिस्तानात सामने खेळायला येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. (pakistan sheikh rashid says that india is responsible for new zealand tour cancel)
धक्कादायक! मोफत धान्य घेणाऱ्यांचा ‘डबल गेम’; सरकारलाच पुन्हा विकले २०० कोटींचे रेशन
न्यूझीलंडची फौज नसेल, तितकी आर्मी आम्ही न्यूझीलंड संघाच्या सुरक्षिततेसाठी तैनात केली होती. न्यूझीलंड आणि इंग्लंडने दौरा रद्द केल्यानंतर सर्वांना असे वाटले की, पाकिस्तान आता एकटा पडेल. मात्र, हा त्यांचा गैरसमज आहे, असे सांगत न्यूझीलंडने दौरा रद्द केला तेव्हाच आता इंग्लंडही खेळण्यास नकार देईल, याचा अंदाज आला होता, असा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी केला आहे.
PM CARES भारत सरकारचा फंड नाही, तो RTI अंतर्गत येत नाही; केंद्राचे स्पष्टीकरण
एक दिवस सर्व संघ पाकिस्तानात खेळायला येतील
एका दिवस असा येईल, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व देशांचे क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळायला येतील, असा मला विश्वास आहे. मात्र, हे सर्व प्रकरण वाढवून सांगितले जात आहे. आता हा मुद्दा इथेच थांबवला गेला पाहिजे. कारण यापेक्षा अधिक महत्त्वाचे मुद्दे पाकिस्तानकडे आहेत, जिथे लक्ष घालणे आवश्यक आहे, असे रशीद यांनी म्हटले आहे.
TATA ची कमाल! ‘ही’ कंपनी देतेय सलग तिसऱ्या वर्षी बोनस; हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी
भारत पाकिस्तानात दहशतवाद पसरवतोय
भारत हा न्यूझीलंड क्रिकेट संघाने दौरा रद्द करावा, असा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आल्यानंतर आता गृहमंत्री रशीद यांनी भारतच पाकिस्तानात दहशतवाद पसरवतोय, असा हास्यास्पद दावा केला आहे. भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका स्वतःला सुपरपॉवर समजू लागले आहेत, असा थयथयाटही रशीद यांनी केला.
TVS चा धमाका! Bajaj ला मात देत ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर ठरली हीट; २७२१ टक्क्यांची वाढ
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेड बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर रमीज राजा यांनी वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरू केलेली दिसत आहे. भारताने पाकिस्तानच्या रणनीतीचा वापर करुन संघ बांधला आणि त्यानंतरच भारतीय संघ उत्तम झाला, असा दावा रमीज राजा यांनी केला आहे. यापूर्वी, न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरे रद्द केल्यानंतर, आम्ही आता वर्ल्डकप स्पर्धेत या सगळ्याचा बदला घेऊ. याआधी फक्त एकच संघ आमचा शत्रु होता. पण आता त्यात न्यूझीलंड आणि इंग्लंडचाही समावेश झाला आहे. कारण तुम्ही आमच्यासोबत योग्य वागला नाहीत आणि याचा बदला आम्ही मैदानात नक्कीच घेऊ, असे रमीज राजा यांनी म्हटले होते.