तालिबान्यांना धडा शिकवण्यासाठी पाक सैन्यप्रमुख काबूलला रवाना
By Admin | Published: December 17, 2014 03:58 PM2014-12-17T15:58:43+5:302014-12-17T15:58:43+5:30
तालिबानी नेता मुल्ला फजुल्लाह याला धडा शिवविण्यासाठी पाकिस्तानी सैन्य प्रमुख जनरल राहिल शरीफ हे अफगाणिस्तानला रवाना झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १७ - तालिबानी नेता मुल्ला फजुल्लाह याला धडा शिवविण्यासाठी पाकिस्तानी सैन्य प्रमुख जनरल राहिल शरीफ हे अफगाणिस्तानला रवाना झाले आहेत. तेहरीक ए तालिबानी पाकिस्तानी या दहशतवादी संघटनेने पेशावरमधील आर्मी शाळेवर दहशतवादी हल्ला केला यामध्ये निष्पाप १४१ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांमध्ये शाळकरी मुलांचा मोठा समावेश होता. दहशतवादी संघटनेने शाळकरी मुलांना टार्गेट केल्याने पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेतली आहे. याचाच भाग म्हणून जनरल राहिल शरीफ यांनी काबूलला भेट द्यायची ठरविले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गणी यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. राहिल हे अफगाणिस्तानच्या राजकीय नेत्यांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय सेक्यूरीटीज असिस्टंट फोर्स कंमाडर यांच्याशी चर्चा करणार आहेत अफगाणच्या सीमेवर लपून बसलेला तेहरीक ए तालिबान पाकिस्तान चा म्होरक्या फजुल्लाह याच्यावर अफगान व पाकिस्तान सैनिकांची संयुक्त कारवाई करण्यासाठी राहिल विनंती करणार आहेत.