पाकिस्तानचा 'डबल गेम' आता चालणार नाही, अमेरिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 06:35 PM2018-01-03T18:35:19+5:302018-01-03T18:40:00+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता अमेरिकन प्रशासनानेही पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत निकी हेली यांनी पाकिस्तान अनेक वर्षांपासून अमेरिकेसोबत डबल गेम खेळत आला आहे, जी ट्रम्प प्रशासनाला अमान्य आहे अशा शब्दांत सुनावलं आहे.

Pakistan's 'double game' will not work now, US warning | पाकिस्तानचा 'डबल गेम' आता चालणार नाही, अमेरिकेचा इशारा

पाकिस्तानचा 'डबल गेम' आता चालणार नाही, अमेरिकेचा इशारा

googlenewsNext

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता अमेरिकन प्रशासनानेही पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत निकी हेली यांनी पाकिस्तान अनेक वर्षांपासून अमेरिकेसोबत डबल गेम खेळत आला आहे, जी ट्रम्प प्रशासनाला अमान्य आहे अशा शब्दांत सुनावलं आहे. अमेरिकेनं तातडीनं कारवाई करत पाकिस्तान लष्कराला करण्यात येणा-या 255 दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत रोखण्याच्या निर्णयाचं समर्थन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पत्रकार परिषदेदरम्यान निकी हेली बोलल्या आहेत की, 'मदत रोखण्याची कारणं स्पष्ट आहेत. पाकिस्तान कित्येक वर्षांपासून डबल गेम खेळत आहे'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'पाकिस्तान आमच्यासोबत काम करत आहे, आणि दुसरीकडे त्याचवेळी दहशतवाद्यांना संरक्षण पुरवत आहेत जे अफगाणिस्तानमधील आमच्या सैनिकांवर हल्ला करतात. हा खेळ ट्रम्प प्रशासनाला स्विकार नाही'.

'ट्रम्प प्रशासनाला दहशतवादविरोधी लढाईत पाकिस्तानकडून अजून जास्त सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे', असं निकी हेली यांनी स्पष्ट केलं. निकी हेली पुढे बोलल्या की, 'जर पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देत राहिलं तर डोनाल्ड ट्रम्प त्यांना देण्यात येणा-या सर्व मदती रोखण्यासाठी इच्छुक आहेत'. निकी हेली नववर्षाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी हे संपुर्ण प्रकरण पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना देण्यात येणा-या सुरक्षेशी संबंधित असल्याचं सांगितलं. 

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणुकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याचे संकेत सोमवारी दिले होते.

गेल्या १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरहून अधिक आर्थिक मदत करण्याचा मूर्खपणा केला आणि आमचे (अमेरिकेचे) नेते मूर्ख आहेत, असे समजून त्या बदल्यात त्यांच्याकडून आमच्या वाट्याला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच आली. आता बस्स झाले!, असे आक्रमक स्वरुपाचे ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारलं. 

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देते असा आरोप करत ट्रम्प यांनी लिहिले की,' शेजारच्या अफगाणिस्तानात अमेरिका ज्या दहशतवाद्यांच्या मागावर आहे त्यांना पकडण्यास मदत करण्याऐवजी पाक त्यांना आश्रय देते'.
 

Web Title: Pakistan's 'double game' will not work now, US warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.