काश्मीरचा म्हणून पाकने दाखवला पॅलेस्टीनचा फोटो, उत्तर देण्याच्या नादात नाचक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 03:25 AM2017-09-25T03:25:37+5:302017-09-25T03:26:16+5:30

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत शुक्रवारच्या भाषणात दहशतवादावरून वाभाडे काढल्यानंतर, जशास तसे उत्तर देण्याच्या नादात पाकिस्तानने रविवारी स्वत:ची चांगलीच फजिती करून घेतली.

Pakistan's picture of Kashmir as a Kashmiri, dancer | काश्मीरचा म्हणून पाकने दाखवला पॅलेस्टीनचा फोटो, उत्तर देण्याच्या नादात नाचक्की

काश्मीरचा म्हणून पाकने दाखवला पॅलेस्टीनचा फोटो, उत्तर देण्याच्या नादात नाचक्की

googlenewsNext

न्यूयॉर्क : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत शुक्रवारच्या भाषणात दहशतवादावरून वाभाडे काढल्यानंतर, जशास तसे उत्तर देण्याच्या नादात पाकिस्तानने रविवारी स्वत:ची चांगलीच फजिती करून घेतली. काश्मीरमध्ये कसे अत्याचार होतात हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न करताना पाकिस्तानने गाझा हल्ल्याचा फोटो दाखवला असून, त्यामुळे जगभरात नाचक्की झाली आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी, उत्तर देण्याचा अधिकार बजावत, आमसभेपुढे उभ्या राहिल्या व स्वयंनिर्णयाचा ‘न्याय्य’ हक्क मागणाºया कश्मिरी जनतेवर भारत सरकार लष्कराकरवी कसे अनन्वित अत्याचार
करीत आहे, याचे खोटेनाटे आरोप करत त्यांनी एक फोटो दाखविला. सुरक्षा
दलांनी पेलेट गनचा मारा केल्याने एका काश्मिरी युवतीच्या चेहºयाची कशी
चाळण झाली, हे जगासमोर आणण्यासाठी लोधी यांनी फोटो दाखविला होता; परंतु प्रत्यक्षात हा फोटो काश्मिरी युवतीचा नसल्याचे लगेच स्पष्ट झाले.
स्वराज यांनी त्यांच्या भाषणात पाकिस्तानला ‘दहशतवादाची निर्यात करणारा प्रमुख कारखाना’ असे
संबोधले होते. याउलट भारतीय लोकशाहीचा चेहरा किती क्रूर आहे, हे दाखविण्यासाठी पाकिस्तानच्या प्रतिनिधीबार्इंनी हा फोटो फडकावला होता. प्रत्यक्षात हा फोटो गाझा पट्ट्यात राहणाºया रवया अबू जोम या १७ वर्षांच्या पॅलेस्टिनी युवतीचा होता.
सन २०१४ मध्ये इस्रायलच्या लष्करी विमानांनी गाझा पट्ट्यातील रहिवासी इमारतींवर बॉम्बहल्ले केले होते. त्यापैकी एका बॉम्बने रवयाचे घर उद््ध्वस्त झाले होते व उडालेल्या काचा व अन्य वस्तूंनी तिच्या चेहºयावर झालेल्या जखमांचा तो फोटो होता.

हे छायाचित्र भारतातील नसून गाझा पट्ट्यात २०१४मध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या १७ वर्षीय रवया अबू जोम हिचे आहे.

Web Title: Pakistan's picture of Kashmir as a Kashmiri, dancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.