इस्लामाबाद : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाची नवी अफगाण रणनीती पाकिस्तानला चीन व रशियाच्या अधिक निकट नेऊ शकते. मीडियातील अहवालात हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवारी रात्री (भारतात मंगळवारी सकाळी) युद्धप्रभावित अफगाणिस्तानसाठी बहुप्रतीक्षित नवी रणनीती जाहीर होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेण्यासाठी अमेरिकेत सर्वसहमती झाल्याचे ट्रम्प प्रशासनाने संकेत दिले आहेत.रणनीतीच्या समीक्षेत दरम्यान ट्रम्प प्रशासनाने भारताच्या भूमिकेच्या शक्यतेवरही विचार केला आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी स्पष्ट केले आहे की, हे धोरण पूर्ण दक्षिण आशियासाठी आहे. द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे की, या धोरणाच्या परिणामांचे संतुलन राखण्यासाठी पाकिस्तान विविध पर्यायांवर विचार करीत आहे. हे धोरण म्हणजे आगामी काळात पाकिस्तानची परीक्षा असेल. अमेरिकेकडून कठोर पावले उचलली जाण्याच्या शक्यतेमुळे चीन आणि रशियासोबत सहकार्य वाढविण्याशिवाय पाकिस्तानकडे अन्य पर्याय राहत नाही, असे सांगण्यात येते. पाक आणि चीन यांच्यातील संबंध ‘वन बेल्ट वन रोड’या योजनेमुळे अधिक दृृढ होत आहेत. (वृत्तसंस्था)मदत होणार बंद?‘फॉरेन पॉलिसी’या मासिकाने म्हटले आहे की, पाकिस्तानला दिली जाणारी सर्व लष्करी मदत संपविण्याचा विचार ट्रम्प प्रशासन करत आहे. पाकिस्तान अमेरिकेला धोका देत आहे, असे अमेरिकेला वाटत आहे. याउलट आम्हाला दबावात ठेवण्याची अमेरिकेची भूमिका आहे, असे पाकिस्तानी अधिकाºयांचे म्हणणे आहे.
अमेरिकेमुळे पाकिस्तानची चीन, रशियाशी जवळीक? ट्रम्प यांचे नवे धोरण होणार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:25 AM