धार्मिक झुंडशाहीपुढे पाकची शरणागती!, लष्कराची मध्यस्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:12 AM2017-11-28T05:12:18+5:302017-11-28T05:12:37+5:30
रावळपिंडी व इस्लामाबाद शहरांना जोडणाºया महामार्गावरील फैझाबाद नाक्यावर ठिय्या देऊन, गेले २० दिवस राजधानीची नाकेबंदी करणाºया हजारो इस्लामी निदर्शकांपुढे पाकिस्तान सरकारने सपशेल शरणागती पत्करली.
इस्लामाबाद : रावळपिंडी व इस्लामाबाद शहरांना जोडणाºया महामार्गावरील फैझाबाद नाक्यावर ठिय्या देऊन, गेले २० दिवस राजधानीची नाकेबंदी करणाºया हजारो इस्लामी निदर्शकांपुढे पाकिस्तान सरकारने सपशेल शरणागती पत्करली. लष्कराच्या मध्यस्थीने रविवारी रात्री सरकार व निदर्शक यांच्यात झालेल्या लेखी समझोत्यानुसार, कायदामंत्री झाहीद हमीद यांनी राजीनामा दिला. इतकेच नव्हे, तर गेल्या १५ दिवसांत अटक केलेल्या सर्व निदर्शकांना
सोडून देताना परतीच्या प्रवासाच्या खर्चासाठी सरकारकडून प्रत्येकी
एक हजार रुपयांचा चेकही दिला गेला!
तिथे ८ नोव्हेंबरपासून धरणे धरून बसलेल्या निदर्शकांना जबरदस्तीने हुसकावण्यासाठी पोलीस व अन्य सुरक्षा दलांनी शनिवारी जोरदार कारवाई सुरू केली. त्या वेळी
मोठा हिंसाचार व जाळपोळ
झाली. त्यात एका पोलीस अधिकाºयासह सहा जणांचा मृत्यू झाला. याशिवाय २०० हून
अधिक निदर्शक व सुमारे ८० पोलीस जखमी झाले. याचे
तीव्र पडसाद पाकिस्तानच्या
प्रमुख शहरांत उमटले व
तेथेही आंदोलनाचे लोण पेटले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव ठेवून पोलीस कारवाई स्थगित केली गेली.
या समझोत्यानुसार दिलेली आश्वासने सरकार पाळेल, याची हमी लष्कराने दिली. देशाला संभाव्य विनाशकारी परिस्थितीतून वाचविल्याबद्दल या समझोतापत्रात लष्करप्रमुख जनरल कमर अब्दुल बाजवा यांचे विशेष आभार मानले गेले. (वृत्तसंस्था)
मोहम्मद पैगंबरांच्या प्रतिष्ठेसाठी...
पाकिस्तानच्या निवडणूक कायद्यानुसार पूर्वी निवडणूक
लढविणाºया आणि नंतर सत्तेच्या पदावर येणाºया प्रत्येक उमेदवारास मोहम्मद पैगंबरांच्या अंतिम प्रेषित्वाशी बांधिलकीची शपथ (खातम-ई-नबुव्वत) घ्यावी लागे. पण सरकारने नव्या कायद्यातून ही शपथ वगळली आहे.
यासाठी कायदामंत्री हमीद यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी तहरीक-ई-लबैक या रसूल अल्ला, तहरीक-ई-खातम-ई-नबुव्वत आणि सुन्नी तहरीक इत्यादी धार्मिक पक्षांनी हे आंदोलन पुकारले होते.