आठवडयाभरात कोसळली पाकिस्तानची दोन फायटर जेट विमाने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 02:52 PM2017-08-17T14:52:31+5:302017-08-17T14:56:11+5:30
पाकिस्तानी हवाई दलाचे फायटर विमान गुरुवारी सारगोधा येथे कोसळले. या विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते.
लाहोर, दि. 17 - पाकिस्तानी हवाई दलाचे फायटर विमान गुरुवारी सारगोधा येथे कोसळले. या विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. लाहोरपासून 200 किलोमीटर अंतरावर सारगोधा येथे ही दुर्घटना घडली. या विमानाचा वैमानिक सुरक्षित आहे. वैमानिक वेळीच विमानातून बाहेर पडल्याने बचावला. हे लढाऊ विमान चिनी बनावटीचे होते.
पाकिस्तान हवाई दलाच्या F7-PG विमानाला सारगोधा येथे अपघात झाला असे पीएएफकडून सांगण्यात आले. पाकिस्तानी हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 10 ऑगस्टला मिआनवाली येथे पाकिस्तानी हवाई दलाचे फायटर जेट कोसळले होते. लाहोरपासून 350 किलोमीटर अंतरावर झालेल्या या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा
चीनच्या सैनिकांची लडाखमध्ये घुसखोरी
मागच्या 15 वर्षात पाकिस्तानी हवाई दलाची 10 ते 11 लढाऊ विमाने कोसळली आहेत. पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यात 50 पेक्षा जास्त चिनी बनावटीची विमाने आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानी लष्कराचे मुशशाक विमान पेशावरजवळ दुर्घटनाग्रस्त झाले होते.
लष्कराची मोठी कारवाई, सहा महिन्यात 92 दहशतवादी ठार
काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असून त्याचा प्रभावही दिसू लागला आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत जवानांनी जवळपास 92 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. 2016 मध्ये जुलैपर्यंतची आकडेवारी पहायला गेल्यास हा आकडा 79 इतका होता. दहशतवादी विरोधी कारवाईत यावर्षी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 2012 आणि 2013 मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. त्यावेळी युपीए सरकार सत्तेत होतं.
लष्कराला मोठं यश
जम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014 मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108, तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचं श्रेय लष्कर, केंद्रीय दलं, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचं आहे.