CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचं थैमान; पण 'या' भागात एकही रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 05:46 AM2020-04-23T05:46:59+5:302020-04-23T07:25:07+5:30

अमेरिकेत कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे; पण तिथलं एक बेट असं आहे, जिथे अजून कोरोनानं शिरकाव केलेला नाही.

Point Roberts gets international acclaim as safest place in US during covid 19 pandemic | CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचं थैमान; पण 'या' भागात एकही रुग्ण नाही

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचं थैमान; पण 'या' भागात एकही रुग्ण नाही

googlenewsNext

पॉइंट रॉबर्ट्स

जगाच्या पाठीवर असे फार थोडे भूभाग, प्रांत आहेत, जिथे कोरोनानं अद्याप पाय पसरलेले नाहीत. अर्थात असं म्हणणंही धाडसाचं ठरेल. कारण अनेक भागात अद्याप कोरोनाच्या चाचण्याही झालेल्या नाहीत. त्यामुळेच तिथे कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत. जंगलात, सामान्य माणसांपासून दूर राहणाऱ्या जमातींमध्येही कोरोना आढळणार नाही, असं म्हटलं जात होतं. पण, त्यांच्यामध्येही कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याचं लक्षात आलं आहे. उलट अशा व्यक्ती कोरोनाच्या लवकर शिकार होतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण त्यांच्या शरीरात अशा विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिकारशक्तीच तयार झालेली नाही.

अमेरिकेत कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे; पण तिथलं एक बेट असं आहे, जिथे अजून कोरोनानं शिरकाव केलेला नाही. या बेटाचं नाव आहे ‘पॉइंट रॉबर्ट्स’! या भागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा भाग अमेरिकेत असला, तर तिथे पोहोचण्याचा मार्ग मात्र कॅनडातून आहे. रस्ते मार्गानं कॅनडातून इथे येता येऊ शकतं. मात्र, कोरोनाचा प्रसार व्हायला सुरुवात झाल्याबरोबर कॅनडानं हा मार्गही बंद केला आहे. त्यामुळे अमेरिकेतला हा भूभाग आता संपूर्ण जगासाठी बंद आहे. मात्र, त्याचमुळे कोरोनाच्या संसर्गापासून तो अमेरिकेतला सर्वात सुरक्षित भाग मानला जातो. पाच चौरस किमीच्या या बेटावर केवळ १३०० नागरिक राहतात. तेथे जायचं तर दोन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडाव्या लागतात. तिथल्या लोकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था सध्या कॅनडातील नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Point Roberts gets international acclaim as safest place in US during covid 19 pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.