सोशल मीडियावरील पोस्टमुळे बेघर व्यक्तीला मिळाली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 10:08 AM2019-03-26T10:08:02+5:302019-03-26T10:08:33+5:30
सोशल मीडियाच्या होणाऱ्या गैरवापराबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कधी चांगले कामही करता येऊ शकते.
लंडन - सोशल मीडियाच्या होणाऱ्या गैरवापराबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कधी चांगले कामही करता येऊ शकते. युनायटेड किंग्डममधील ईस्ट ससेक्स इथे राहणाऱ्या एका मुलाने सोशल मीडियाचा वापर करून एका गरजू बेघर व्यक्तीला नोकरी मिळवून दिली.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी, अँथोनी जॉन्सन या बेघर व्यक्तीने आपल्याला कामाची गरज असल्याचे पत्र लिहून ते एका बस स्टॉपबाहेर चिटकवले होते. त्यात त्याने हाताला काम नसल्याने आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीचे हृदयद्रावक वर्णन करून आपल्याला कामाची गरज असल्याचे म्हटले होते. दरम्यान, ''चार्लेट हावर्ड या 16 वर्षीय मुलाने काही दिवसांपूर्वी फेसबूकवर या पत्राचे छायाचित्र काढून पोस्ट शेअर केली. त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
दरम्यान, ही पोस्ट व्हायरल होऊन माळीकाम करणाऱ्या नेल्सन स्मिथ यांच्यापर्यंतही पोहोचली. स्मिथ यांनाही एका सहाय्यकाची गजर होती. त्यानंतर नेल्सन यांनी जॉन्सनशी संपर्क साधला आणि त्यांना नोकरीची ऑफर दिली. पुन्हा एकदा रोजगार मिळाल्याने जॉन्सलच्या आनंदाला पारावार उरला नाही. नेल्सनसुद्धा जॉन्सनच्या कामाप्रति असलेल्या उत्सुकतेमुळे प्रभावित झाले. ''सोशल मीडियावर पोस्ट पाहिल्यानंतर मी चार्लोट याच्याशी संपर्क साधला. मी त्याच्यासाठी काही करू इच्छित होतो. आता येत्या सोमवारपासून तो कामावर रुजू होणार आहे.'' असे नेल्सन यांनी सांगितले.