गाताना उभी न राहिल्यानं गर्भवती गायिकेची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 09:48 AM2018-04-13T09:48:19+5:302018-04-13T09:48:19+5:30
आरोपीवर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करा; गायिकेच्या पतीची मागणी
पाकिस्तान: गर्भवती गायिका गाताना उभी न राहिल्यानं तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना पाकिस्तानात घडली आहे. सिंधमधील लरकानामध्ये एका मैफिलीत हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीवर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गायिकेच्या पतीनं केली आहे.
सिंधमधील कांगा गावात आयोजित करण्यात आलेल्या एका मैफिलीत २४ वर्षांची समिना समून गाणं सादर करत होती. गर्भवती असल्यानं गाताना उभं राहणं समिनाला शक्य नव्हतं. त्यामुळे ती बसून गाणं होती. यावेळी उपस्थित श्रोत्यांपैकी काहीजण स्टेजजवळ येऊन पैशांची उधळण करत होते. यावेळी स्टेजजवळ आलेला एकजण तिला उभं राहून गाण्यास सांगू लागला. तेव्हा समिना काहीशा अनिच्छेनं उभं राहण्याचा प्रयत्न करु लागली. समिना उभी राहताच तिला उभं राहण्यास सांगणाऱ्या व्यक्तीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या.
Samina Sindhu, a 6-month pregnant Sindhi singer, was shot dead in Larkana by Tariq Jatoi. He asked her for stand-up performance. On refusal, he threatened her. Later when she stood up, Jatoi fired bullets in her body. Now, Jatois are pressurising her husband to withdraw from case pic.twitter.com/Frey8w79lw
— Kapil Dev (@kdsindhi) April 11, 2018
अवघ्या काही सेकंदांमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. यानंतर समिनाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. समिनावर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव तारिक अहमद जतोई असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तारिकला पोलिसांनी अटक केली आहे. तारिकविरोधात दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी समिनाच्या पतीनं केली आहे.