प्रेग्नेंट मुलीने बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईचा केला होता मर्डर, 'या' कारणाने झालं होतं भांडण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 11:58 AM2021-11-03T11:58:53+5:302021-11-03T11:59:46+5:30
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, हीदर मॅकने इंडोनेशियाच्या बाली येथील एका लक्झरी हॉटेलमध्ये बॉयफ्रेन्डसोबत मिळून आपल्या आईची हत्या केली होती.
बॉयफ्रेन्डसोबत मिळून आपल्या आईची हत्या करणाऱ्या महिलेला अमेरिकेला (America) डिपोर्ट करण्यात आलं आहे. इंडोनेशिया (इंडोनेशिया) सरकारने तुरूंगात सोडल्यानंतर महिलेला परत पाठवलं आहे. ज्यावेळी महिलेने तिच्या आईची हत्या (Daughter Killed Mother) केली तेव्हा महिला स्वत: प्रेग्नेंट होती. तिने आईचा मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. पण तिला त्यात यश आलं नाही. त्यानंतर तिला दोषी ठरवत कोर्टाने तिला तुरूंगात पाठवलं होतं. मात्र, चांगल्या व्यवहारामुळे तिला लवकर सोडण्यात आलं.
कसा केला होता मर्डर
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, हीदर मॅकने इंडोनेशियाच्या बाली येथील एका लक्झरी हॉटेलमध्ये बॉयफ्रेन्डसोबत मिळून आपल्या आईची हत्या केली होती. आई आणि मुलीमध्ये काही कारणाने भांडण सुरू होतं. तेव्हाच तिथे बॉयफ्रेन्ड पोहोचला आणि त्याने एक जड ट्रे उचलून गर्लफ्रेन्डच्या आईच्या डोक्यात मारला. डोक्यावर गंभीर जखम झाल्याने आणि भरपूर रक्त वाहून गेल्याने पीडितेचा जागीच मृत्यू झाला होता. त्याने मृतदेह सूटकेसमध्ये भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला.
आईला पसंत नव्हता मुलीचा बॉयफ्रेन्ड
आई आणि मुलीच्या भांडणाचं कारण मुलीचा बॉयफ्रेन्ड होता. आईला पसंत नव्हतं की, हीदर मॅकने बॉयफ्रेन्ड सोबतचं नातं पुढे वाढवू नये. आधीही दोघांमध्ये याबाबत लढाई झाली होती. हॉटेलमध्ये जेव्हा आईला समजलं की, मुलगी बॉयफ्रेन्डच्या मुलाची आई होणार आहे. तर ती रागावली होती. त्यावरून झालेल्या भांडणामुळे आईला आपला जीव गमवावा लागला.
कोर्टाने सुनावली होती १० वर्षांची शिक्षा
घटना घडली तेव्हा प्रेग्नेंट हीदर मॅकने तुरूंगातच बाळाला जन्म दिला होता. आता दोघांना परत अमेरिकेत पाठवण्यात आलं आङे. कोर्टाने मृत महिलेच्या मुलीला १० आणि तिच्या बॉयफ्रेन्डला १८ वर्षांची शिक्षा सुनावली होती. तुरूंगातील चांगल्या व्यवहारामुळे हीदरला काही वर्षाआधीच सोडण्यात आलं आहे. हीदर मॅकला तिने जे केलं त्याचा अजिबात पश्चाताप नव्हता.