त्रिपोली : फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांनी लिबियामधील तुर्कस्तानच्या अल वाटिया हवाई तळावर मोठा हल्ला चढविला आहे. यामध्ये तुर्कस्तानची काही लढाऊ विमाने, ड्रोन आणि मोठी विमाने उद्ध्वस्त झाली आहेत. या हल्ल्यात तुर्कस्तानचे काही सैनिकही जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या सैनिकांना हवाई तळाच्या शेजारीच असलेल्या अल जमील शहरातील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
द अरब विकलीच्या वृत्तानुसार लिबियावरून इजिप्त आणि तुर्कस्तानमध्ये तणाव आहे. तुर्कस्तानने लिबियाची राजधानी त्रिपोलीपासून 125 किमी लांब नूकल अल कमस जिल्ह्यामध्ये अल वाटिया हवाई तळ उभारला आहे. तेथे लढाऊ विमाने, ड्रोन आणि मिसाईल सिस्टिमही तैनात करण्यात आली आहे. याला इजिप्त आणि फ्रान्सचा विरोध असून आपल्याला धोका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावरून इजिप्तने अनेकदा तुर्कस्तानला इशाराही दिला होता.
तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्री हुलुसी अकार यांनी त्रिपोलीचा दौरा केला होता. यालाच उत्तर म्हणून इजिप्त आणि फ्रान्सने आज हा हल्ला केल्याची शक्यता आहे. लिबियामध्ये तुर्कस्तानची उपस्थितीवरून या देशांमध्ये वाद झाले आहेत. जर तुर्कस्तानी समर्थकांनी मिलिशिय सिर्ते शहराकडे कूच केली तर सैन्य कारवाई करावी लागेल, असा थेट इशाराच इजिप्तने दिला होता.
वाटिया हवाई तळावर कोणत्याही लढाऊ विमान किंवा ड्रोनची तैनाती केल्यास लिबियामधील अन्य देशांच्या सैनिक तळांना धोक्याचे आहे. यामुळे फ्रान्सनेही आधी आक्षेप नोंदविला होता. इजिप्तमध्ये या हवाई तळावरील हल्ल्याचे अनेक फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे फोटो वाटिया हवाई तळावरील असल्याचे सांगितले जात आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कमाईची मोठी संधी! Yes Bank निम्म्या दराने शेअर विकणार
Rajasthan Political Crisis: गेहलोत बहुमतात, तरीही आमदार अज्ञातस्थळी? भाजपकडून फ्लोअर टेस्टची मागणी
OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही
सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही
शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल
कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे