चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:34 PM2021-09-17T21:34:37+5:302021-09-17T21:35:34+5:30

ताजिकिस्तानची राजधानी दुशाम्बे येथे आयोजित परिषदेत पुतीन यांनी व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने आपले म्हणणे मांडले.

Russia needs to support taliban and international communities too says vladimir putin   | चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य

चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य

Next

तालिबाननेअफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर, काही देश तालिबानसोबत चांगले संबंध ठेवण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. चीन आणि पाकिस्ताननंतर, आता रशियानेही तालिबानशी सकारात्मक संबंधांच्या दिशेने पाऊल टाकले आहे. रशियाला तालिबानसोबत काम करावे लागेल, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीत त्यांनी हे भाष्य केले. मात्र, महत्वाची गोष्ट म्हणजे, बहुतांश देशांनी अद्यापही तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. (Russia needs to support taliban and international communities too says vladimir putin)

ताजिकिस्तानची राजधानी दुशाम्बे येथे आयोजित परिषदेत पुतीन यांनी व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने आपले म्हणणे मांडले. पुतीन म्हणाले, रशियाने अफगाणिस्तानमुद्द्यावर संयुक्त राष्ट्र परिषदेतच पाठिंबा दिला आहे. याशिवाय, जगातील प्रभावशाली देशांनीही अफगाणिस्तानातील परिस्थिती स्थिर करण्यावर विचार करावा हवा. महत्वाचे म्हणजे, चीननंतर रशियानेही तालिबानला उघडपणे समर्थन दिले आहे.

पंतप्रधान मोदींनी सांगितले तालिबानी संकटाचे धोके; अफगाणिस्तान मुद्द्यावर केलं थेट भाष्य

अशी आहे भारताची भूमिका - 
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) - कलेक्टिव सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन (सीएसटीओ)च्या आउटरीच शिखर सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. मोदी यांनी अफगाणिस्तानसंदर्भात 4 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, पहिला मुद्दा असा, की अफगाणिस्तानातील शासन बदल सर्वसमावेशक नाही आणि ते कुठल्याही संवादाशिवाय झालेले आहे. दुसरे म्हणजे, अफगाणिस्तानात अस्थिरता आणि कट्टरतावाद कायम राहिला, तर जगभरात दहशतवादी आणि अतिरेकी विचारधारेला उत्तेजन मिळेल. इतर अतिरेकी गटांना हिंसाचाराच्या माध्यमाने सत्ता मिळविण्याचे प्रोत्साहनही मिळू शकते. 

याच बरोबर, अफगाणिस्तानमध्ये ड्रग्ज, अवैध शस्त्रे आणि मानवी तस्करीचे प्रमाण वाढू शकते. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रे राहिली आहेत. यामुळे, संपूर्ण प्रदेशातच अस्थिरतेचा धोका राहील. भयंकर मानवी संकट हा चौथा सर्वात मोठा मुद्दा, असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

 

Web Title: Russia needs to support taliban and international communities too says vladimir putin  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.