Russia Ukraine War: झेलेन्स्कींनी तडकाफडकी राजीनामा दिला तर...; युक्रेनमध्ये नव्या युद्धाला सुरुवात होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:00 PM2022-03-03T17:00:23+5:302022-03-03T17:10:08+5:30
Russia Ukraine War: रशियाला जमिनीवरील सत्य माहीत नाही, त्यांचे सरकार सत्यापासून खूप दूर चालले आहे. आता युक्रेनचे लोक हातात शस्त्र घेण्यास तयार आहेत हे रशियाला कळत नाहीय.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेले युद्ध जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने नेऊ लागले आहे. रशियाने अणुबॉ़म्ब टाकण्याची भाषा केली आहे. तर प्रत्यक्षात रशियन फौजांना मूठभर असलेल्या युक्रेनी सैन्याने नामोहरम करून सोडले आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार रशियाला जबर धक्का बसला आहे. रशियाचा महत्वाचा जनरल मेजर युक्रेनमध्ये मारला गेला आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांचा राजीनामा मागितला आहे. असे झाले तर काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियन हल्ल्यांना सडेतोड उत्तर देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे आज दोन्ही देशांमधील चर्चेची दुसरी फेरी बेलारूसच्या ओब्लास्टमध्ये होणार आहे. जर युद्धाची अशीच परिस्थिती राहिली आणि झेलेन्स्की यांनी राजीनामा दिला तर युक्रेनमध्ये नवे गृह युद्ध सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
युक्रेनचे फरार माजी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर फेडोरोविच यानुकोविचला युक्रेनचा पुन्हा राष्ट्राध्यक्ष करण्याचा रशियाने आखल्याचे समोर येत आहे. व्हिक्टर यांना २०१४ मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे पायऊतार व्हावे लागले होते. त्यांना देश सोडून रशियात शरण घ्यावी लागली. व्हिक्टर सध्या रशियाच्या मिन्स्कमध्ये लपलेले आहेत. झेलेन्सी यांना हटवून यानुकोविचला युक्रेनचा पुन्हा राष्ट्राध्यक्ष केले तर युक्रेवनमध्ये यादवी सुरु होण्याची शक्यता आहे.
यावर युक्रेनचे राजकीय तज्ज्ञ Oleksiy Haran यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी झेलेन्स्की खूप प्रसिद्ध आहेत. जनतेत त्यांची लोकप्रियता खूप आहे. ९० टक्के लोकांना ते आवडतात. तर त्यांच्या सांगण्यावरून ८५ टक्के लोकांनी रशियाविरोधात लढण्यासाठी हातात शस्त्रे घेतली आहेत.
रशियाला जमिनीवरील सत्य माहीत नाही, त्यांचे सरकार सत्यापासून खूप दूर चालले आहे. आता युक्रेनचे लोक हातात शस्त्र घेण्यास तयार आहेत हे रशियाला कळत नाहीय. युक्रेनच्या लोकांनी चोख प्रत्युत्तर द्यायचे ठरवले आहे. अशा स्थितीत गृहयुद्धाचा प्रश्नच उद्भवत नाही आणि अशाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बदलता येणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.