मॉस्को : रशियाचे एक हेलिकॉप्टर उत्तर सायबेरियात कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर उत्तर सायबेरियाच्या एका आॅइल स्टेशनला जात होते. रशियाच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले की, एमआय- ८ हेलिकॉप्टरमध्ये चालक दलाचे तीन सदस्य व १५ प्रवासी होते. हे हेलिकॉप्टर दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडकले. दुसरे हेलिकॉप्टर सुरक्षित जमिनीवर उतरले.
रशियाचे हेलिकॉप्टर कोसळून १८ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 4:42 AM