Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आला कार्डियक अरेस्ट; जमिनीवर कोसळले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:49 AM2023-10-24T11:49:19+5:302023-10-24T12:11:19+5:30
Russian President Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कार्डियक अरेस्ट आला आहे. पुतिन त्याच्या बेडरूममध्ये जमिनीवर पडलेले आढळून आले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कार्डियक अरेस्ट आला आहे. पुतिन त्यांच्या बेडरूममध्ये जमिनीवर पडलेले आढळून आले. जनरल SVR पोस्टने असा दावा केला आहे की "रविवारी रात्री मॉस्को वेळेनुसार अंदाजे 21:05 वाजता, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना पुतिन यांच्या खोलीतून पडण्याचा आवाज ऐकू आला. दोन सुरक्षा अधिकारी ताबडतोब राष्ट्राध्यक्षांच्या खोलीत गेले तेव्हा ते जमिनीवर पडलेले दिसले."
"पुतिन य़ांच्या आजूबाजूला अन्न सांडलं होतं. खोलीतील टेबलही पडला होता." वृत्तानुसार, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या निवासस्थानातील वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज खोलीत नेण्यात आले, जिथे त्यांना शुद्ध आलं. पुतिन यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती आता ठीक आहे.
Russian President Vladimir #Putin suffers #cardiac arrest in the presidential bedroom, an insider group reveals
— Bruce P. Stuart (@brcplmrstrt) October 23, 2023
Russian President Vladimir Putin has suffered a cardiac arrest in his bedroom following months of speculation over his health, a source has claimed.
General SVR /… pic.twitter.com/RJ38Adtuiu
'टेलीग्राम' चॅनेलने रशियन राष्ट्राध्यक्षांना कार्डियक अरेस्ट आल्याची बातमी दिली. सुरक्षारक्षकांना ते बेडरूममध्ये जमिनीवर पडलेले दिसले. त्यानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानी हेल्थ इमर्जन्सी रुममध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. 69 वर्षीय पुतिन यांचा फिटनेस पाहून तरुणांनाही घाम फुटतो. व्लादिमीर पुतिन आपल्या फिटनेसशी तडजोड करत नाहीत.
दिवसभर स्वतःला सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुतिन दररोज जिममध्ये व्यायाम करतात. याशिवाय पुतिन यांना पोहण्याचाही शौक आहे. पुतिन त्यांच्या आहाराची देखील विशेष काळजी घेतात आणि त्यांना असे काहीही दिले जात नाही ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ शकेल. पुतिन यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रक्षकांकडून प्रथम त्यांच्या अन्नाची चाचणी केली जाते.