बीजिंग : चीनच्या उत्तरेकडील भागात दशकातील सर्वात माेठ्या वाळूच्या वादळाचा तडाखा बसला आहे. चीनची राजधानी बीजिंगला वादळाचा सर्वाधिक फटका बसला असून, ४०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर ३४१ नागरिक बेपत्ता झाले आहेत. (Sandstorm in China leaves 341 missing)चीनच्या उत्तर मंगाेलिया भागातील गाेबी वाळवंटाकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हे वादळ निर्माण झाले. बीजिंग शहरावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. शहरावर तांबड्या व पिवळ्या रंगाचे आच्छादन निर्माण झाले आहे. बीजिंग आणि जवळच्या परिसराला सर्वाधिक फटका बसला. बीजिंगमध्ये दृश्यमानता एक किलाेमीटरहून कमी झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये धुलीकणांचे प्रमाण ८ हजार मायक्राे ग्रॅम या अत्युच्च धाेकादायक पातळीवर पाेहाेचले. हे प्रमाण ५० मायक्राेग्रॅमहून अधिक असल्यास हवा धाेकादायक मानली जाते. पीएम २.५ या कणांचे प्रमाणही ३०० मायक्राे ग्रॅमहून अधिक झाले आहे. चीनमध्ये सरासरी प्रमाण ३५ मायक्राेग्रॅम आहे. याचे जास्त प्रमाण फुप्फुसासाठी धाेकादायक असते.
मंगाेलियाला माेठा फटका- वाळूच्या वादळामुळे मंगाेलियाला माेठा फटका बसला आहे. चीनच्या सरकारी शिनुआ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार जवळपास ३४१ जण बेपत्ता झाले. - मंगाेलिया प्रांताची राजधानी असलेल्या हाेहाेत येथील विमानतळावर अनेक विमाने उतरविण्यात आली आहेत. - तर बीजिंगमध्ये दृश्यमानता कमी झाल्यामुळे ४०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.