Saudi Crown Prince : जगभरात तेलाची चर्चा होताच सर्वातआधी सौदी अरबचा उल्लेख होतो. जगात सर्वात जास्त तेलाची निर्मिती सौदी अरबमध्ये होते. सौदी अरबचा क्राउन प्रिन्स मोबम्मद बिन सलमानला (Mohammed Bin Salman) सौदीच्या अर्थव्यवस्थेची निर्भरता तेलावर कमी करायची आहे. सौदीच्या वर्तमान किंगचं नाव सलमान बिन अब्दुल अजीज आहे. त्यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमान सौदीचा क्राउन प्रिन्स आहे.
रिपोर्ट्सनुसार, सौदी अरबचा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान फारच लक्झरी लाइफ जगतो. भरमसाठ दौलत, लक्झरी कार्स, आलिशान महाल आणि शाही जहाजसहीत त्याची लाइफस्टाईल नेहमीच चर्चेत राहते. चला जाणून घेऊ कश आहे त्याची लाइफस्टाईल...
३१ ऑगस्ट १९८५ मध्ये जन्मलेला मोहम्मद बिन सलमान हा सध्याचा किंग सलमान बिन अब्दुल अजीज यांची तिसरी पत्नी फहदा बिन्त फलाहचा मुलगा आहे. मोहम्मदचे वडील अब्दुल अजीजने ७९ वर्षांचे असताना गादी सांभाळली होती. जून २०१७ मध्ये किंग सलमानला क्राउन प्रिन्स म्हणजे होणारा प्रिन्स बनवण्यात आलं होतं. त्याला MBS म्हणून ओळखलं जातं.
ग्रॅज्युएशननंतर MBS ने २००९ मध्ये आपल्या किंगचा विशेष सल्लागार म्हणून काम केलं. त्याआधी अनेक स्टेट एजन्सीसोबत त्याने काम केलं. द गार्डियननुसार, ३६ वर्षीय MBS ला काम करण्याची फार आवड आहे. त्यामुळे तो ऑफिसमध्ये साधारण १८ तास काम करतो.
CNBC च्या एका रिपोर्टनुसार, सौदीच्या शाही परिवारात साधारण १५ सदस्य आहेत. सौदी रॉयल फॅमिली त्यांच्या अल यममाह पॅलेसमध्ये राहते. सीबीएस न्यूजने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं की, जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सौदी अरबच्या रियादमध्ये रॉयल फॅमिलीच्या विशाल एर्गा पॅलेसमध्ये गेले होते तेव्हा एमबीएसला गोल्ड प्लेटेड क्लेनेक्स डिस्पेंसर आणि सोन्याच्या खुर्चींसोबत बघितलं होतं. या शाही परिवाराबाबत सांगितलं जातं की, स्वित्झर्लॅंड, लंडन, फ्रान्स आणि मोरक्कोसहीत जगभरातील देशांमध्ये त्यांच्या प्रॉपर्टी आहेत.
business Insider च्या रिपोर्टनुसार, सौदी क्राउन प्रिन्स एमबीएसच्या फॅमिलीकडे जवळपास ७३७.५० खरबपेक्षा जास्त संपत्ती आहे. तेच Bloomburg च्या रिपोर्टनुसार, MBS ची संपत्ती १,३९,७०० कोटी पेक्षा अधिक आहे. काही रिपोर्ट्सनुसार, क्राउन प्रिन्सकडे ७७६ अब्जापेक्षा अधिक संपत्ती आहे.
एमबीएसकडे एक लक्झरी यॉट आहे ज्याची किंमत साधारण ३१.२७ अब्ज रूपये इतकी आहे. ४३९ फूट लांब या जहाजावर दोन हेलिपॅड, एक पाणबुडी आणि एक नाइट क्लब, मुव्ही थिएटर, जिमसारख्या सुविधा आहेत.त्यासोबतच MBS ने लिओनार्डो दा विंचीची एक पेंटिंग खरेदी केली होती. ज्याची किंमत ४.९१ अब्ज रूपये आहे. रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, २०१७ मध्ये एमबीएस जगातलं सर्वात महागडं घर खरेदी केलं होतं. ज्याची किंमत २३.२४ अब्ज रूपये आहे.
NY Post नुसार, MBS ला आपल्या परिवाराकडून महागडे गिफ्ट मिळत होते. १६ वर्षांचा असताना त्याला जेवढे गिफ्ट, सोन्याची नाणी आणि लक्झरी गाड्या मिळाल्या होत्या त्या विकून त्याने जवळपास ७७.५६ लाख रूपये जोडले होते. त्यातून त्याने शेअरचा बिझनेस सुरू केला होता. त्यातून त्याला फायदा झाला तर त्याने आपल्या कंपनी लॉन्च केल्या.