हवामान बदलामुळे प्राचीन पर्माफ्रॉस्ट वितळणे मानवासाठी एक नवा धोका निर्माण करू शकतो. यासंदर्भात बोलताना वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की त्यांना दोन डझनहून अधिक व्हायरस मिळाले आहेत. यांपैक एक एका तलावाखाली जमा झालेला होता. तो जवळपास 48,500 वर्षांहूनही अधिक जुना आहे.
युरोपातील वैज्ञानिकांना रशियाच्या सयबेरिया भागातील पर्माफ्रॉस्ट मधून काही सॅम्पल्स मिळाले आहेत. याचे त्यांनी परीक्षण केले. वैज्ञानिकांनी १३ नव्या पॅथोजेनना जिवंत केले आहे आणि त्यांचे विशेषत्व सांगितले आहे. यांना झॉम्बी व्हायरस असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना संशोधकांनी म्हटले आहे, की ते हजारो वर्ष बर्फात राहूनही संक्रमक आहेत.
काय म्हणाले वैज्ञानिक - वातावरणातील तापमानवाढीमुळे पर्माफ्रॉस्ट वितळल्याने मिथेनसारखे ग्रीनहाऊस वायू बाहेर पडतील आणि पर्यावरण आणखी खराब होईल. मात्र, सुप्त पॅथोजेन्सवर याच्या परिणामांसंदर्भातील अद्याप फारशी माहिती नाही, असा इशाराही वैज्ञानिकांनी या पूर्वीच दिला आहे.
यासंदर्भात बोलताना रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, त्यांनी शोधलेल्या व्हायरसना पुन्हा जिवंत करण्याचा जैविक धोका पूर्णपणे शून्य होती. कारण त्यांनी अशा स्ट्रेनना टार्गेट केले होते, जे अमीबा मायक्रोब्सनाच संक्रमित करू शकतील. मात्र, यातील एक व्हायरस हा जनावरे अथवा मानवाला संक्रमित करू शकतो, हे अत्यंत धोक्याचे आहे. याच वेळी त्यांनी इशारा देत म्हटले आहे, की त्यांचे काम वेगळे केले जाऊ शकते.
वैज्ञानिकांनी प्रीप्रिंट रिपॉझिटरी बायोरेक्सिव्हवर पोस्ट करण्यात आलेल्या एका आर्टिकलमध्ये लिहिले आहे, की 'प्राचीन पर्माफ्रॉस्ट वितळल्यानंतर या व्हायरसला रिलीज करू शकतो. अद्याप या लेखाचे पुनरावलोकन करण्यात आलेले नाही. बाहेरील वातावरणात आल्यानंतर, एक व्हायरस किती वेळ इन्फेक्शन पसरवू शकतो? हे कसे रोखले जाऊ शकते आणि आणि एक व्यक्ती किती वेळा संक्रमित होऊ शकतो, याचा अंदाज लावने अशक्य आहे.