SCO Summit 2022 Live Updates: “हे युद्धाचं युग नाही,” पंतप्रधानांचा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना सल्ला; पुतीन म्हणाले, “युक्रेन…”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 08:28 PM2022-09-16T20:28:32+5:302022-09-16T20:30:33+5:30
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची बैठक पार पडली. यावेळी मोदी आणि पुतीन यांच्यात रशिया युक्रेन युद्धावरही चर्चा झाली.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची बैठक पार पडली. यावेळी मोदी आणि पुतीन यांच्यात रशिया युक्रेन युद्धावरही चर्चा झाली. “हे युग युद्धाचं नाही. मी तुमच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली होती. शांततेच्या मार्गानं पुढे कसं जाता येईल यावर चर्चा करायची आहे. भारत आणि रशिया अनेक दशकांपासून एकत्र आहेत,” असं मोदी यावेळी म्हणाले.
यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीदेखील उत्तर दिलं. “युक्रेन संघर्षावर तुमची स्थिती मी जाणतो. मी तुमची चिंताही समजतो. हे संकट लवकर संपावं अशी आमची इच्छा आहे. परंतु दुसरा पक्ष युक्रेन त्यांना संवाद प्रक्रियेत सहभागी व्हायचं नाहीये. आमचं ध्येय आम्हाला युद्धाच्या मैदानातच गाठायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही याबाबत संपूर्ण परिस्थितीची तुम्हाला माहिती देत राहू,” असं पुतीन यांनी स्पष्ट केलं.
#WATCH | I know about your position on the conflict in Ukraine & also about your concerns. We want all of this to end as soon as possible. We will keep you abreast of what is happening there: Russian President Putin during a bilateral meet with PM Modi
— ANI (@ANI) September 16, 2022
(Source: DD) pic.twitter.com/jkSBQzcqtO
चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी पुतीन आणि युक्रेनचे आभार मानले. संकटकाळात जेव्हा आमचे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते तेव्हा तुमच्या आणि युक्रेनच्या मदतीनं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तिथून बाहेर आणू शकलो असं ते म्हणाले. आजही जगासमोरील सर्वात मोठी आव्हाने म्हणजे विकसनशील देशांसाठी अन्न सुरक्षा, इंधन सुरक्षा, खतांची समस्या आहे. यावर मार्ग काढावा लागेल. तुम्हीही यासाठी पुढाकार घ्यावा, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.