मेलबर्न, दि. 17 - कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेला सजीवांचा उदय ही पृथ्वीच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. पण या जगात सजीव कसे आले असावेत याचे रहस्य शास्त्रज्ञांना गेल्या अनेक वर्षांपासून सतावत आहेत. मात्र आता हे रहस्य उलगडल्याचा दावा शास्त्रझांनी केला आहे . ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या या दाव्यानुसार सुमारे 65 कोटी वर्षांपूर्वी शेवाळांच्या उदयातून भूतलावर सजिवांचा उदय झाला. मध्य ऑस्ट्रेलियातील काही खडकांचे विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर जोशेन ब्रोक्स या शोधाबाबत माहिती देनाना म्हणाले की,"आम्ही या खडकाच्या तुकड्यांची पूड करून त्यातील जीवाणूंचे अणू वेगळे केले. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार शेवाळांचा उदय हा पृथ्वीवरील प्राण्यांच्या उत्पत्तीमध्ये महत्त्वपूर्ण ठरला. त्याच्याशिवाय पृख्वीवर मनुष्य आणि इतर प्राणी अस्तित्वात आले नसते. अधिक वाचा 40 वर्षात पृथ्वीवरील वन्यजीव 52 टक्क्यांनी घटले!पृथ्वीवरील जिवाणूंची मंगळावर सर्वप्रथम वसाहतमहाकाय लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनेयासंदर्भातील शोधनिबंध नेचर या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. दरम्यान, या संशोधनाचे नेतृत्व करणारे जोशोन ब्रोक्स म्हणाले, "आम्ही गोळा केलेल्या नमुन्यांनुसार 65 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील जैविक रचना वैशिष्ट्यपूर्ण बनली होती. ती इकोसिस्टिममधील एकप्रकारची क्रांती होती. त्यातील महत्त्वाचा घटक ठरला होता तो शेवाळाचा उदय. शेवाळाचा या पारिस्थितीक क्रांतीत महत्त्वाचा टप्पा ठरला. त्याविना पृथ्वीवर प्राणीजीवन अस्तित्वात आले नसते." त्याकाळात समुद्रातील पोषक घटकांची दर्जेदार पातळी आणि अनुकुल वैश्विक वातावरण यामुळे संपूर्ण पृथ्वीवर शेवाळांच्या निर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती." भोजनाच्या तळावार या पोषक रचनेने जटील पारिस्थितिक तंत्रांना ऊर्जा पुरवली. यामध्ये मोठे प्राणी आणि मनुष्याचाही समावेश होता."त्याबरोबरच आम्ही या खडकांवर आाण्विक जिवाश्मांचा शोध घेतला आहे. या संशोधनादरम्यान आम्ही संपूर्ण पृथ्वीच्या थंड होण्याचा येथील गुंतागुंतीच्या आणि दीर्घ जीवनाशी थेट संबंध आहे हा मोठा शोध लावला आहे याची आम्हाला लवकर जाणीव झाली होती.
पृथ्वीवरील प्राण्यांच्या अस्तित्वाच्या सुरुवातीचे रहस्य उलगडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 5:44 PM