भारतामध्ये ‘शून्या’चा वापर तिस-या शतकापासून, नवे संशोधन, हस्तलिखित अपेक्षेहून अधिक प्राचीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:25 AM2017-09-15T01:25:01+5:302017-09-15T13:18:43+5:30

अंकगणिताला पूर्णत्व देणारे ‘शून्य’ ही भारताने दिलेली देणगी आहे. भारतात ‘शून्या’चा वापर मानले गेले त्याहून सुमारे पाचशे वर्षे आधी म्हणजे तिस-या किंवा चौथ्या इसवी शतकात झाला असावा, असे संशोधनावरून स्पष्ट झाले आहे.

 'Shunya' is used in India from the third century, new research, more ancient than manuscript anticipation | भारतामध्ये ‘शून्या’चा वापर तिस-या शतकापासून, नवे संशोधन, हस्तलिखित अपेक्षेहून अधिक प्राचीन

भारतामध्ये ‘शून्या’चा वापर तिस-या शतकापासून, नवे संशोधन, हस्तलिखित अपेक्षेहून अधिक प्राचीन

Next

लंडन: अंकगणिताला पूर्णत्व देणारे ‘शून्य’ ही भारताने दिलेली देणगी आहे. भारतात ‘शून्या’चा वापर मानले गेले त्याहून सुमारे पाचशे वर्षे आधी म्हणजे तिस-या किंवा चौथ्या इसवी शतकात झाला असावा, असे संशोधनावरून स्पष्ट झाले आहे.
सत्तर भूर्जपत्रांवर लिहिलेले ‘भाखशाली हस्तलिखित’ हा ‘शून्या’चा वापर दर्शविणारा सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो. पेशावरजवळच्या भाखशाली गावातील शेतात खोदमाक करताना सन १८८१ मध्ये हे हस्तलिखित मिळाले म्हणून ते ‘भाखशाली हस्तलिखित’ म्हणून ओळखले जाते. आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या बॉडलेनियन ग्रंथालयात ते जतन करून ठेवले गेले आहे.
गणित या विषयावर लिहिलेल्या या हस्तलिखितात शेकडो ठिकाणी ‘शून्या’चा वापर केलेला आहे. हे हस्तलिखित भारतामध्ये सापडलेले ‘शून्या’संबंधीचे सर्वात प्राचीन हस्तलिखित आहे. ते कोणत्या काळातील आहे, हा वर्षांपासूनचा संशोधनाचा विषय आहे. लिखाणाची शैली आणि त्यातील गणितविषयक आशय यांचा अभ्यास करून हयाशी तकाओ या जपानी विद्वानाने या हस्तलिखिताचा काळ आठव्या आणि १२ व्या शतकादरम्यानचा असावा, असा अंदाज वर्तविला होता.
बॉडलेनियन ग्रंथालयाने गुरुवारी असे जाहीर केले की, त्यांनी ‘भाखशाली हस्तलिखिता’चा काळ निश्चित करण्यासाठी ‘रेडिओ कार्बन डेटिंग’ या खात्रीशीर तंत्राचा प्रथमच वापर केला व त्यावरून हे हस्तलिखित आधी मानले गेले त्याहून किमान ५०० वर्षे जुने आसावे असे त्यातून निष्पन्न झाले. म्हणजेच त्याचा काळ इ.स. तिसºया ते चौथ्या शतकातील येतो. हे हस्तलिखित एकाच वेळी नव्हे तर निरनिराळ््या काळात केलेल्या लिखाणाचे संकलन असावे.
प्राचीन भारतीय विव्दानांनी ‘शून्या’चा एक स्वतंत्र अंक म्हणून सर्वप्रथम वापर सुरु केला व शून्याला त्याच्या स्थानानुसार निरनिराळे मूल्य दिले गेल्याने अंकगणित व आधुनिक काळात डिजिटल व्यवहार सुलभ झाले हे सर्वमान्य आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये शून्य ‘टिंबा’च्या स्वरूपात किंवा पोकळ वर्तुळाकार लिहिलेले आढळते. ग्वाल्हेर येथील एका मंदिरावरील कोरीवकामात वापरलेले ‘टिंब’रूपी शून्य ही आजवरची शून्याची सर्वातप्राचीन नोंद मानली जात होती. नव्या संशोधनानुसार ‘भाखशाली हस्तलिखित’ हे आता त्याहूनही प्राचीन ठरले आहे.

हस्तलिखिताची वैशिष्ट्ये

एक स्थानांक म्हणून शून्याचा वापर मायन आणि बॅबिलियॉन यासारख्या प्राचीन संस्कतीमध्येही केला गेल्याचे पुरावे आहेत. परंतु ‘भाखशाली हस्तलिखित’ दोन बाबतीत वैशिष्ठ्यपूर्ण आहे. आज आपण सर्रासपणे जसे पोकळ वर्तुळाकार शून्य लिहितो तशा शून्याचे लेखन यात सर्वप्रथम झाल्याचे दिसते.
दुसरे म्हणजे शून्याचा स्वतंत्र अंक म्हणून वापर करणे व शून्याचा उपयोग करून शतपटीने वा हजारपटीने मोठ्या संख्यांचे सहजी लिखाण करणे भारतीयांनी सर्वप्रथम सुरु केले हे यावरून सिद्ध होते.
प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणिती ब्रह्मगुप्त याने सन ६२८ मध्ये लिहिलेल्या ‘ब्रह्मस्फुटसिद्धांत’ या ग्रंथात अशा वर्तुळाकार शून्याचा वापर केल्याचे दिसते.
70 भूर्जपत्रांवर लिहिलेले ‘भाखशाली हस्तलिखित’ हा ‘शून्या’चा वापर दर्शविणारा सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो.

आधुनिक जगाचा पाया ज्या ‘शून्या’वर रचला गेला त्याच्या संकल्पनेचे बिज भारतीय गणितींनी तिसºया शतकातच रोवले होते, असे आपण आज म्हणू शकतो. भारतीय गणिती पांडित्याच हा पुरावा आहे. - मार्कस द््यू सॉतॉय, गणित प्राध्यापक, आॅक्सफर्ड विद्यापीठ

लंडनमध्ये ४ आॅक्टोबर पासून सुरु होणाºया ‘इल्युमिनेटिंग इंडिया: ५००० इयर्स आॅफ सायन्स’ या प्रदर्शनात हे हस्तलिखित प्रदर्शित
केले जाणार आहे.

Web Title:  'Shunya' is used in India from the third century, new research, more ancient than manuscript anticipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत