वॉशिंग्टनः न्यू मेक्सिकोमधील सॅन्टे फे सिटी येथील शीख व्यक्तीच्या रेस्टॉरंटची तोडफोड केली आणि भिंतीवर तिरस्कार करणारे संदेश (Hate Messages) लिहिले.
मंगळवारी एका मीडिया रिपोर्टनुसार, या तोडफोडीत इंडियन पॅलेस नावाच्या रेस्टॉरंटचे जवळपास १,००,००० डॉलरचे नुकसान झाले आहे. स्थानिक पोलिस आणि एफबीआय या घटनेचा तपास करत आहेत. शीख अमेरिकन कायदेशीर संरक्षण आणि शिक्षण फंडने (SALDEF) या घटनेचा निषेध केला आहे.
SALDEF च्या कार्यकारी संचालक किरण कौर गिल यांनी सांगितले की, "अशा प्रकारचा द्वेष आणि हिंसाचार अस्वीकार्य आहे आणि सर्व अमेरिकन लोकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कारवाई केली पाहिजे."
स्थानिक वृत्तपत्रानुसार रेस्टॉरंटचे टेबल्स उलथून टाकले. काचेची भांडी खाली फेकली. तसेच, दारूचे रॅक रिकामे करण्यात आले. देवीच्या प्रतिमेची तोडफोड केली. संगणकाची चोरी करण्यात आली.
रेस्टॉरंट मालक बलजीत सिंग म्हणाले, "मी स्वयंपाकघरातून येऊन पाहिल्यानंतर याठिकाणी सर्व तोडफोड केली होती. तसेच, 'व्हाइट पॉवर', 'ट्रम्प २०२०', 'गो होम' असे रेस्टॉरंटच्या भिंतींवर लिहिले होते. तर, यापेक्षा वाईट भाषेत रेस्टॉरंटच्या काउंटर आणि इतर ठिकाणी स्प्रे पेंटिंगने लिहिलेले होते."
आणखी बातम्या...
"पंडित नेहरू नसते तर चीनचा प्रश्नच निर्माण झाला नसता", भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान
भारताचे मंत्रालय आणि कंपन्या चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर - रिपोर्ट
46 वर्षांनंतर पहिल्यांदाच PPF वरील व्याजदर होऊ शकतो 7 टक्क्यांपेक्षा कमी!
'मेड इन चायना' नको तर मग 'या' ब्रँडचे खरेदी करू शकता स्मार्टफोन