वॉशिंग्टन : सूर्याच्या पृष्ठभागामुळे निर्माण झालेले शक्तीशाली सौर वादळ (Solar strom) तब्बल 16,09,344 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे वादळ उद्या, रविवारी किंवा सोमवारी कोणत्याही क्षणी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. या वादळामुळे सॅटेलाईट सिग्नलांमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. यामुळे विमानांची उड्डाणे, रेडिओ सिग्नल, कम्युनिकेशन आणि हवामानावर मोठा परिणाम होण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. (SOLAR WINDS travelling at speeds of a million miles an hour are expected to batter the planet this weekend and could trigger a geomagnetic storm above Earth.)
स्पेसवेदर डॉट कॉम वेबसाईटनुसार, सूर्याच्या वायुमंडळात या वादळाचा उगम झाला आहे. यामुळे अंतराळातील एका भागावर याचा मोठा प्रभाव दिसणार आहे. यामुळे उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील भागात राहणाऱ्या लोकांना आकाशात सुंदर नजारा पहायला मिळणार आहे. दोन्ही ध्रुवांजवळ रात्रीच्या वेळी आकाशात चमकणारी किरणे दिसतात, त्यांना आरोरा असे म्हणतात.
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अंदाजानुसार हे वादळ 1609344 किमी प्रति तासाच्या वेगाने पुढे सरकत आहे. याचा वेग कदाचित याहूनही जास्त असू शकतो. जर अंतराळातील महावादळ पृथ्वीवर आले तर अनेक शहरांतील वीज गायब होण्याची शक्यता आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले. सौर वादळामुळे पृथ्वीचे बाहेरील वायुमंडळाची उष्णता वाढू शकते. याचा थेट परिणाम सॅटेलाईटवर होण्याची शक्यता आहे. यामुळे जीपीएस नेव्हीगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाईट टीव्हीमध्ये बाधा येऊ शकते. विद्युत भारित तारांमध्ये वीज प्रवाह वाढू शकतो यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील जळू शकतात. सामान्यपणे अशा वादळांना टक्कर देण्यासाठी पृथ्वीची चुंबकीय शक्ती सुरक्षा कवचाचे काम करते. यामुळे अशी परिस्थिती शक्यता खूप कमी असते.
१९८९ ची आठवण...१९८९ मध्ये कॅनडाच्या क्युबेक शहरात १२ तासांसाठी वीज गायब झाली होती. यामुळे लाखो लोकांना त्रास सहन करावा लागला होता. अशाचप्रकारे १८५९ मध्ये महाशक्तीशाली जिओमॅग्नेटिक वादळ आले होते. या वादळाने युरोप आणि अमेरिकेतील दळणवळण यंत्रणा नेस्तनाभूत केली होती.