पश्चिमी लंडनच्या तीन सुपरमार्केटमध्ये खाण्याच्या वस्तूमध्ये इंजेक्शनच्या माध्यमातून रक्त मिसळण्याच्या आरोपाखाली एका वकीलाला कोर्टासमोर हजर केले. लेओई एलघरीब नावाच्या या वकीलावर बुधवारी संध्याकाळी फुलहम पॅलेस रोडवरील टेस्को एक्सप्रेस, लिटिल वेट्रोज आणि सेन्सबरी या तीन दुकानांमध्ये चुकीच्या रितीने खाण्याच्या वस्तूंमध्ये रक्त मिसळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी मुख्य न्यायाधीश पॉल गोल्डस्प्रिंग म्हणाले की, हे प्रकरण इतकं गंभीर आहे की, कोर्टात सुनावणी करुच शकत नाही. एलघरीबला थेट जेलमध्ये पाठवा. मी हे प्रकरण कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येत नसून या कोर्टासाठी हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. जर आरोपी दोषी असेल तर त्याला या कोर्टाच्या शक्तीपेक्षा अधिक शिक्षा मिळायला हवी. त्यानंतर ३७ वर्षीय आरोपीला २४ सप्टेंबरला आइलवर्थ क्राऊन कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
एलघरीबवर आरोप आहे की त्याने संध्याकाळी ७.३० च्या सुमारास वेट्रोज दुकानात घुसला आणि रक्ताने भरलेलं इंजेक्शन सगळीकडे फेकण्यास सुरुवात केली. इतकचं नाही तर खाण्याच्या वस्तूंमध्येही त्याने हे इंजेक्शन मिसळलं. उपस्थित असलेल्या एका ग्राहकानं याबाबत पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वेट्रोज, सेन्सबरी आणि टेस्को एक्सप्रेसच्या ती दुकानं पोलिसांनी बंद केली. सध्या या दुकानांची चाचणी केली जात आहे. हॅमरस्थिथ फुलहम काऊंसिलने या तीन दुकानांमधून कुठलीही वस्तू खरेदी करू नका आणि घेतली असल्यास फेकून देण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी फुलहम पॅलेस रोडवरील फॉरेन्सिक सूट अधिकाऱ्यांनी दुकानातील सर्व सामान जप्त केले आहे.