स्पेन हल्ला; पाच अतिरेकी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:07 AM2017-08-19T01:07:12+5:302017-08-19T01:07:15+5:30
बार्सिलोना शहरात पर्यटकांची वर्दळ असणा-या भागात व्हॅन घुसवून केलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे.
बार्सिलोना : बार्सिलोना शहरात पर्यटकांची वर्दळ असणा-या भागात व्हॅन घुसवून केलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. या हल्ल्याच्या आठ तासानंतर बार्सिलोनापासून १२० किमी दूर दक्षिण भागात केंब्रिल्स शहरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी पाच संशयितांना गोळ्या घालून ठार मारले.
या संशयितांनी अंगावर स्फोटक बेल्ट लावले होते. या संशयित अतिरेक्यांचा बार्सिलोनातील घटनेशी संबंध असावा असा दावा पोलिसांनी केला. पोलिसांनी दोन संशयितांना पकडले असून यातील एक स्पेनचा तर दुसरा मोरोक्कोचा नागरिक आहे. वाहन चालक अद्याप फरार आहे. बार्सिलोनाच्या प्रसिद्ध लास रॅम्ब्लास भागात गुरुवारी एक सुसाट व्हॅन नागरिकांना चिरडत निघाली आणि एकच गोंधळ उडाला. पायी चालणाºया लोकांच्या अंगावर ही व्हॅन आली आणि काही कळण्याच्या आतच १३ जणांचा मृत्यू झाला
होता. (वृत्तसंस्था)
>दु:खाच्या प्रसंगी आम्ही एकजूट आहोत
स्पेनमध्ये समुद्रकिनाºयालगतच्या दोन शहरात गर्दीत व्हॅन घुसवून केलेल्या हल्ल्यात १३ ठार, तर १०० जखमी झाले आहेत. यातील पहिली घटना दहशतवादी हल्ला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. स्पेनचे पंतप्रधान मारियानो राजॉय यांनी जनतेला संबोधित करताना म्हटले आहे की,
या दु:खाच्या प्रसंगी आम्ही एकजूट आहोत. आमची
मूल्ये आणि जीवनपद्धती हिसकावून घेऊ पाहणाºयांवर आम्ही मात करू. बार्सिलोनातील पीडितात फ्रान्स, व्हेनेजुएला, आॅस्ट्रेलिया, आयर्लंड, पेरु, अल्जिरिया आणि चीनसह १८ देशातील नागरिकांचा समावेश आहे. स्पेन हे जगातील तिसरे सर्वात मोठे पर्यटन स्थळ आहे. आतापर्यंत या भागात असा अतिरेकी हल्ला झाला नव्हता. शेजारच्या फ्रान्स, जर्मनीत असे हल्ले झालेले आहेत.