इराकच्या सदर शहरात दहशतवाद्यानं केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 35 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 60 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. हल्ला सोमवारी सायंकाळी झाला. इराकमध्ये मंगळवारी ईद असल्यामुळे बाजारात मोठी गर्दी होती, याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतला. दहशतवादी संघटना IS नं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
या हल्ल्यानंतर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधेमींनी सुरक्षा कमांडर्सची आपतकालीन बैठक बोलावली आहे. तर, राष्ट्रपती बरहाम सालेह यांनी सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, घडलेली घटना अत्यंत वाईट आहे. काही जणांनी ईदमुळे झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन आत्मघाती हल्ला केला. आता जोपर्यंत दहशतवाद मुळापासून संपत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत.
7 महीन्यात IS चा तिसरा हल्लायाच वर्षी एप्रिलमध्ये IS ने इराकच्या सदर शहातील एका बाजारात हल्ला केला होता. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता तर 20 जखमी झाले होते. त्यापूर्वी, जानेवारीमध्ये सेंट्रल बगदाद तायारन स्क्वायर मार्केटमध्ये झालेल्या सुसाइड बॉम्ब अटॅकची जबाबदारीही IS ने घेतली होती. त्या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला होता.