वॉशिंग्टन : इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड््स सैन्यदलाच्या ‘कुद््स फोर्स’चे कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने हत्या केली, असे नवे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. सुलेमानींकडून अमेरिकेची निंदानालस्ती आपण किती दिवस ऐकून घ्यावी, असाही त्यांनी सवाल केला.राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या फ्लोरिडा राज्यात निधी उभारणीसाठी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी ३ जानेवारीस सुलेमानी यांची हत्या केली जाण्यापूर्वीच्या काही क्षणांच्या घटनाक्रमाचेही रसभरित वर्णन केले. ते म्हणाले की, व्हाईट हाऊसच्या नियंत्रण कक्षात लष्कराचे वरिष्ठ अधिकारी मला सुलेमानी यांच्या हालचालींची क्षणाक्षणाची माहिती देत होते. सुलेमानी चिलखती मोटारीने बगदाद विमानतळातून बाहेर पडताना त्यांना उपग्रहाकडून मिळणाऱ्या चित्रांवरून दिसत होते. एका ठराविक वेळातच त्यांच्या मोटारीवर हल्ला करणे शक्य होणार होते. (वृत्तसंस्था)
‘आमच्याबद्दल वाईट बोलायचे म्हणून सुलेमानींंची हत्या केली’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 4:19 AM