लंडन : कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सहा प्रकार आढळले आहेत. लंडन येथील किंग्ज कॉलेजमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यासाठी मार्च व एप्रिल महिन्यात ब्रिटन व अमेरिकेतील १,६०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. कोरोना विषाणूची बाधा झाल्याच्या पहिल्या आठ ते दहा दिवसांत यातील काही रुग्णांना संसर्गाची कमी किंवा मध्यम, तर काही जणांमध्ये तीव्र लक्षणे आढळून आली. वयोवृद्ध रुग्णांची तब्येत कोरोना संसर्गामुळे आणखी नाजूक झाल्याचेही आढळले.नवनवीन गोष्टी उजेडातच्कोरोना विषाणूची साथ सुरू होऊन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे या विषाणूमुळे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा जगभरातील शास्त्रज्ञ सखोल अभ्यास करीत आहेत. त्यातून कोरोना संसर्गाच्या नवनवीन गोष्टी उजेडात येत आहेत.च्कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात यश आल्यानंतर या संसर्गावरील वैद्यकीय उपचारांना नवी दिशा मिळणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.कोरोना विषाणूचा सहा प्रकारे संसर्ग झाल्याचे दिसले. त्यातील पहिल्या प्रकारात फ्लूसारखी लक्षणे रुग्णांमध्ये दिसत होती; पण त्यांना ताप आला नव्हता. या रुग्णांना सर्दी, घसा व छातीत दुखणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, डोकेदुखी हे त्रास जाणवले.या विषाणूमुळे झालेल्या दुसºया प्रकारच्या संसर्गात रुग्णामध्ये फ्लूची सगळी लक्षणे दिसली व त्याला तापही आला होता. त्याला अपचन झाले होते, तसेच त्याचा आवाजही बसला होता. त्याला कोरडा खोकला झाला होता.कोरोना विषाणूमुळे तिसºया प्रकारचा जो संसर्ग होतो त्याचा संबंध पोटातील अवयवांशी असतो. जठर व आतड्यांच्या कार्यावर या संसर्गाचा परिणाम होऊन त्या रुग्णाची पचनक्रिया मंदावते. त्याला कफ होण्याचे प्रमाण कमी असले तरी निराश वाटणे, उलट्या होणे, अतिसार आदी लक्षणे या रुग्णात दिसून येतात, तसेच त्याला छातीत दुखण्याचा व डोकेदुखीचाही त्रास काही वेळा सहन करावा लागतो.या विषाणूमुळे होणाºया चौथ्या प्रकारच्या संसर्गात त्या रुग्णाला अशक्तपणा येतो. त्याची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. थकवा जाणवणे, डोकेदुखी, वास व चव यांची संवेदना न जाणवणे, छातीत दुखणे, ताप, असे त्रास या रुग्णाला सहन करावे लागतात.कोरोना विषाणूमुळे पाचव्या प्रकारच्या होणाºया संसर्गात रुग्णाच्या शरीरातील रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होतो. त्याचा मेंदूच्या कार्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. डोकेदुखी, वासाची संवेदना न जाणवणे, कफ, अपचन, ताप, मनाचा गोंधळ उडणे, आवाज बसणे, घसा व छातीत दुखणे, थकवा येणे, स्नायूदुखी, अशी लक्षणे या रुग्णात आढळतात.जगात हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूच्या सहाव्या प्रकारच्या संसर्गात, या आजाराची बाधा झाल्यानंतर पहिल्या काही आठवड्यांत रुग्णाच्या मनाचा वारंवार गोंधळ उडतो. घसादुखी, सतत येणारा ताप, अपचन, डोकेदुखी, अतिसार, श्वसनास त्रास होणे, स्नायू तसेच पोटात दुखणे, अशी लक्षणे या रुग्णात आढळतात. या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतात. वेळप्रसंगी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले जाते किंवा आॅक्सिजन दिला जातो.
दोन देशांत पाहणीतील निष्कर्ष : संसर्गाचे आढळले सहा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 1:41 AM